घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात ५ जण बुडाले; दोघांचा मृत्यू

मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात ५ जण बुडाले; दोघांचा मृत्यू

Subscribe

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात ५ विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची शालेय सहल ही आज मुरूड तालुक्यातील काशिद येथे आली होती.

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी हे समुद्रात पोहोण्यासाठी काशिद समुद्रात गेले असता, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. त्यापैकी प्रणव कदम (१५) आणि रोहन संतोष बेडवाल (१५) याचा मृतदेह सापडला आहे. तर कृष्णा पाटील आणि तुषार वाघ यांच्यासहित तिघांना वाचविण्यात यश आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रोहन दिलीप महाजन (१५), तुषार हरिभाऊ वाघ (१५) ,कृष्णा विजय पाटील (१५) या तिघांना वाचविण्यात यश आले. परंतु या तिघांना उपचारासाठी अलिबाग येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ८० विद्यार्थी हे पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात आले होते. त्यांच्यासोबत ५ शिक्षकही होते. मुरुड जंजिरा येथील काशिद समुद्रकिनारी हे सर्वजण गेले असता, यामधील ५ विद्यार्थी समुद्रात बुडाले.


हेही वाचा : हा कसा फुटला, तो कसा फुटला, मुख्यमंत्र्यांची कॅसेट सुरूच; एकनाथ खडसेंची टीका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -