घरक्रीडाIND vs SL: वनडे मालिकेपूर्वी 'या' सरकारची मोठी घोषणा, क्रिकेटप्रेमींना दिलं अनोखं गिफ्ट

IND vs SL: वनडे मालिकेपूर्वी ‘या’ सरकारची मोठी घोषणा, क्रिकेटप्रेमींना दिलं अनोखं गिफ्ट

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांचा थरार रंगला. यावेळी टी-२० या मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, टी-२० सामन्यांनंतर उद्या १० जानेवारीपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. परंतु वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच आसाम सरकारचं क्रिकेटवरील असलेलं प्रेम दिसून आलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यासंदर्भात आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आसाम सरकारने क्रिकेट प्रेमींना अनोखं गिफ्ट दिलं आहे. तब्बल ४ वर्षांनंतर गुवाहाटीच्या स्टेडियममध्ये सामना खेळवला जाणार आहे. ही बाब लक्षात घेता, आसाम सरकारने १० जानेवारी रोजी ‘हाफ डे’च्या सुट्टीची घोषणा केली आहे. सरकारने ही सुट्टी फक्त जिल्ह्यापुरता जाहीर केली आहे.

- Advertisement -

श्रीलंका विरुद्ध भारत हा सामना भारतात खेळवला जात आहे. गुवाहाटीतील चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. या सामन्यात चाहत्यांना विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना पाहण्याची थेट संधी मिळणार आहे. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्टेडियमची पाहणी केली. तसेच तयारीचा आढावाही घेतला. त्याचप्रमाणे संपूर्ण व्यवस्थेबाबत त्यांनी आसाम क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. याशिवाय गुवाहाटी पोलिसांनी ठोस बंदोबस्त केला असून ट्रॅफिक नियमांबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९१ धावांनी विजय मिळवला. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडला. यावेळी भारतीय संघाने हा सामना ९१ धावांनी जिंकून मालिका २-१ ने जिंकली.

- Advertisement -

हेही वाचा : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -