घरदेश-विदेशगेल्या सात-आठ वर्षात रेल्वेने कात टाकलीः नरेंद्र मोदी

गेल्या सात-आठ वर्षात रेल्वेने कात टाकलीः नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना मकर संक्रांत व पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, वंदे भारत पुढे तेलंगणा व आंध्र प्रदेशला जोडण्याचे काम करेल. वंदे भारतच्या प्रवासात अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे ही एक्सप्रेस धार्मिक व पर्यटनाला सोबत नेणारी आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून वंदे भारत ओळखली जाईल.  

नवी दिल्लीः गेल्या सात ते आठ वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने रेल्वे प्रवास सुखद केला. रेल्वे क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे रेल्वेचा कायापालट झाला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आठव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सिकंदराबाद व विशाखापट्टणम येथून ही एक्सप्रेस जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना मकर संक्रांत व पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, वंदे भारत पुढे तेलंगणा व आंध्र प्रदेशला जोडण्याचे काम करेल. वंदे भारतच्या प्रवासात अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस धार्मिक व पर्यटनाला सोबत नेणारी आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून वंदे भारत ओळखली जाईल.

- Advertisement -

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, मकर संक्रातीच्या दिवशी वंदे भारत ही तेलंगणा व आंध्र प्रदेशला मिळालेली एक अनोखी भेटच आहे. स्वप्न व इच्छापूर्तीसाठी भारत नेहमी आघाडीवरच असतो. सिंकदराबाद व विशाखापट्टणम येथील पर्यटनाला या एक्सप्रेसमुळे चालना मिळेल. गेल्या सात ते आठ वर्षात केंद्रातील भाजप सरकारने रेल्वेमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळेच रेल्वेने कात टाकली आहे. रेल्वे प्रवास सुखद झाला आहे. नागरिकांना अपेक्षित अशा सुविधा रेल्वेमध्ये दिल्या जातात.

वंदे भारतचे नवे वेळापत्रक १६ जानेवारीपासून सुरु होईल. या ट्रेनचे बुकींग शनिवारी सुरु झाले आहे. पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी वंदे भारत विशाखापट्टणम-सिंकदराबाद एक्सप्रेस विशाखापट्टणम येथून सुटेल व दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी ती सिंकदराबाद येथे पोहोचेल. सिंकदराबाद येथून दुपारी ३ वाजता पुन्हा वंदे भारत सुटेल व रात्री साडेकराच्या सुमारास विशाखापट्टणम येथे पोहोचणार आहे. १,१२८ प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करु शकतात. याआधी वंदे भारतला अपघात झाले आहेत. त्यावर दगडफेकही झाली आहे. मात्र वंदे भारतचे पुढील नियोजन व प्रवास काही थांबलेला नाही.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -