घरताज्या घडामोडीहार्बर रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक अर्ध्या तासाने पुन्हा रुळावर

हार्बर रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक अर्ध्या तासाने पुन्हा रुळावर

Subscribe

सोमवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड स्थानकादरम्यना ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाल होता. परिणामी प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी जमली होती.

हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक अखेर सुरू झाली आहे. सोमवारी दुपारी रे रोड स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे हार्बर रेल्वेची सर्व लोकल सेवा ठप्प झाली होती. अखेर अर्ध्यातासानी ही वाहतूक पूर्वरत करण्यात आली. (harbor line Start After half an hours stopped due to broken overhead wire)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड स्थानकादरम्यना ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाल होता. परिणामी प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी जमली होती.

- Advertisement -

ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक लोकल गाड्या रे-रोड स्थानकादरम्यान थांबल्या होत्या. त्यावेळी लोकल गाड्या उशिराने धावणार असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम युद्धपातळीवर केले. अखेर दुपारी चार ते सव्वाचार वाजताच्या सुमारास हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.

दरम्यान, ऐन संध्याकाळी कामवरून सुटण्याच्या वेळेत हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. मात्र, अर्ध्या तासानी लोकल वाहतूक रुळावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्व:स सोडला.

- Advertisement -

हेही वाचा – पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची 4 तास ईडी चौकशी, चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -