घरमहाराष्ट्रजेपी नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवला; लोकसभा निवडणुकीचं करणार नेतृत्व

जेपी नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवला; लोकसभा निवडणुकीचं करणार नेतृत्व

Subscribe

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुक ही जेपी नड्डा यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. अमित शाह म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर आज जेपी नड्डा यांच्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. जो भाजपच्या सर्व सदस्यांनी ते मान्य केले आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

पुढील वर्षी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशातील जनतेकडून जनमत मागणार आहेत. यापूर्वी 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांबाबत राजकीय समज निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये विशेषत: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी लोकसभेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये भाजपच्या सध्या 93 पैकी 87 जागा आहेत.

- Advertisement -

आपल्या संविधानानुसार संघटना निवडली जाते. हे वर्ष सभासदत्वाचे वर्ष आहे, कोविडमुळे सभासदत्वाचे काम वेळेवर होऊ शकले नाही, त्यामुळे घटनेनुसार कामाचा विस्तार करण्यात आला आहे. अशा स्थितीत राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला, ज्याला एकमताने पाठिंबा मिळाला. आता नड्डा जून 2024 पर्यंत अध्यक्ष राहतील. ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना बिहारमध्ये आमचा स्ट्राइक रेट सर्वाधिक होता, एनडीएला महाराष्ट्रातही बहुमत मिळाले. यूपीतही जिंकलो, बंगालमध्ये आमची संख्या वाढली. गुजरातमध्ये आम्ही दणदणीत विजय मिळवला. ईशान्य भागातही काम केले.

जेपी नड्डा यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका अधिक चांगल्या पद्धतीने पार पडतील यावर अमित शहा यांनी भर दिला. 2019 पेक्षा जास्त जागा जिंकल्या जातील. जेपी नड्डा यांनी अमित शाह यांच्याकडून पक्षाची कमान हाती घेतली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पक्षाने प्रचंड बहुमताने पुनरागमन केले तेव्हा अमित शहा यांना केंद्राच्या राजकारणात आणण्यात आले. त्यांना गृहमंत्री करण्यात आले. त्याचवेळी जेपी नड्डा यांना पक्षाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

जेपी नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. अनेक प्रसंगी एकत्र राहून त्यांनी पक्षाचे अनेक कार्यक्रम पुढे नेण्याचे काम केले आहे. अशा स्थितीत त्या उत्तम समन्वयाच्या दृष्टीने २2024 ची लढाईही जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सज्ज झाली आहे. जेपी नड्डा यांनी त्या मोठ्या परीक्षेची रूपरेषा आधीच तयार केली आहे.


ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं; मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर झळकावले शिंदे-फडणवीसांचे मोठे कटआऊट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -