घरदेश-विदेशपीओकेनंतर करा, आधी काश्मिरी पंडितांचा जीव वाचवा; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पीओकेनंतर करा, आधी काश्मिरी पंडितांचा जीव वाचवा; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

संसद देशातील सर्वात मोठी पंचायत आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे. सत्तेवर असलेल्या मोदी, भाजप सरकारने 2014 मध्ये काश्मीरचाच मुद्दा उचलून धरला, त्यावर लोकांनी त्यांना मतदान केले. त्यावेळी त्यांनी पीओके घेऊन येणार अशी घोषणा केली, पण ते नंतर बघा, आधी काश्मीरी पंडितांचा जीव वाचवा म्हणत  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत आज जम्मू- काश्मीरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहचले आहेत. या यात्रेत सहभागी होण्याआधी खासदार राऊत काश्मीरमधील काश्मीरी पंडितांच्या एका आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

काश्मीरी पंडितांची छोटी मागणी सरकार पूर्ण करु शक नाही मग.. 

राऊत म्हणाले की, जम्मू- काश्मीरीमधील काश्मीरी पंडितांना नोकरी देत पगार चालू करून, त्यांच्या मुला-बाळांना सुरक्षा द्यावे, अशी छोटी मागणी या काश्मीरी पंडितांची आहे. पण काश्मीरी पंडितांची ही छोटीशी मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही, मग पीओकेवर चर्चा का करत आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

 मोदी सरकारने काश्मीरमध्ये येऊन काश्मीरी पंडितांचा आक्रोश ऐकला पाहिजे

2014 मध्ये पहिली निवडणूक झाली, त्यावेळी काश्मीरी पंडितांचा आणि राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिली. या देशात काश्मीरी पंडितांचा रक्त वाहिल आहे, त्यांचा तो आक्रोश, आकांत आम्ही विसरु शकत नाही. पण हे सरकार सगळं कसं विसरली? सरकारने, गृहमंत्र्यांनी, एलजीने काश्मीरमध्ये येऊन त्यांच्या भावना, आक्रोश ऐकून घेतला पाहिजे. मानवतेच्या भावनेतून तरी ऐकून घ्यावं. सरकार पुन्हा या मुद्दावर राजकारण करु इच्छित आहे का? पुन्हा त्यांच्या जीवावर निवडणूक लढू इच्छित असतील तर हे चुकीचं आहे, म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर टीका केला आहे.

- Advertisement -

जर हे बाळासाहेब ठाकरे करू शकतात तर मोदी सरकार का करु शकत नाही? 

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या देशाचे पहिले नेते होते ज्यांनी काश्मीरी पंडितांचा मुद्दा उचलून धररला, आणि सांगितले की, महाराष्ट्राचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले आहेत. आजही महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबईत गेल्यास काश्मीरी पंडितांच्या कॉलनी तयार केल्या आहे. त्याठिकाणी लोकं राहत आहेत. त्यांच्या मुलांना शाळेत आरक्षण दिले. जे ते लोकं नोकरी करत आहे. त्यांच्याबद्दल तिथे एक आदर आहे. हे सर्व बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. जर हे बाळासाहेब ठाकरे करू शकतात तर मोदी, अमित शाह का करु शकत नाही? असा सवालही राऊतांनी केला आहे.

काश्मीर पंडितांच्या मुद्द्यावर सरकार एवढा हलगर्जीपण दाखवत आहे. काश्मीरी पंडित खास करुन बोलतो, भाजप काश्मीरी पंडितांच्या मुद्यावर राजकारण करत आहे. काश्मीर आणि काश्मीरी जनता हा राजकारणाचा मुद्दा नाही. पंतप्रधान मोदींनी प्रथम काश्मीरी पंडितांच्या मागण्या पूर्ण करण्याचं छोट काम आधी केलं पाहिजे. सरकारची काय इच्छा आहे, या लोकांनी काश्मीरच्या खोऱ्यातील मृत्यूच्या खाईत जावं, असा आरोपही राऊतांनी केला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -