घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंबड पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुखांची बदली

अंबड पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुखांची बदली

Subscribe

नाशिक : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधीतून अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी नि:पक्षपणे व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्ष देशमुख यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्याकडे अंबड पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी आणि आर्थिक मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याकडून होणारी वसुली, एका तक्रारीच्या प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडेच लाच मागितल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये लक्षवेधीतून मांडली होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ अपर पोलीस महासंचालकामार्फत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके हे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी देशमुख यांची बुधवारी (दि. १८) सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -