घरताज्या घडामोडीनिवडणुकीचं बिगुल : पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकवर कोट्यवधींच्या योजनांची बरसात

निवडणुकीचं बिगुल : पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकवर कोट्यवधींच्या योजनांची बरसात

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. कर्नाटक दौऱ्यानंतर मोदी मुंबईत येणार आहेत. मात्र कर्नाटकात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकसाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद करणार असल्याची घोषणा केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. कर्नाटक दौऱ्यानंतर मोदी मुंबईत येणार आहेत. मात्र कर्नाटकात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकसाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद करणार असल्याची घोषणा केली. (PM Narendra Modi Karnataka Mumbai Visit Today)

कर्नाटकमधील मोदी यांनी आज यादगिरी जिल्ह्यात कोट्यवधींच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. कोडकल येथे सिंचन, पिण्याचे पाणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांशी संबंधित विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायणपूर डाव्या काठाच्या कालव्याचा विस्तार, नूतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, “कलबुर्गी, यादगिरी आणि विजयपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना नारायणपूर डाव्या किनारी कालव्याच्या विस्ताराचा थेट लाभ मिळणार आहे. कर्नाटकात येणाऱ्या सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या भागाचे कामही आज सुरू झाले आहे. यामुळे कलबुर्गी आणि यादगिरीमध्ये राहण्याच्या सुविधेत वाढ होणार असून, अनेक लोकांना इथे राहायला मिळेल”, असे त्यांनी सांगितले.

पुढे पंतप्रधान म्हणाले की, “उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी ज्याप्रकारे वेगाने काम केले जात आहे ते कौतुकास्पद आहे. याबद्दल मी मुख्यमंत्री बोम्मई यांचे कौतुक करतो. आमच्या सरकारने यादगिरीसह देशातील अशा १०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम सुरू केला. आम्ही या जिल्ह्यांमध्ये सुशासनावर भर दिला आणि विकासाच्या प्रत्येक स्तरावर काम सुरू केले. डबल इंजिन सरकार कसे चालते याचे उत्तम उदाहरण हर घर जल अभियानात पाहायला मिळाले”.

- Advertisement -

“भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता देश पुढील 25 वर्षांसाठी नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढे जात आहे. हा काळ प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी अमृत आहे. या काळात आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक राज्य या मोहिमेत सामील होईल, तेव्हा शेतात काम करणाऱ्या शेतकरी किंवा उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे आयुष्य चांगले होईल तेव्हा भारताचा विकास होऊ शकेल”, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबईत बॅनरवॉर! पंतप्रधान मोदींचा बाळासाहेबांना वाकून नमस्कार; भाजपालाच डिवचण्याचा प्रयत्न

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -