घरमहाराष्ट्रराज ठाकरेंकडे जैन धर्मगुरूंनी केली 'ही' मागणी; म्हणाले, 'बाळासाहेबांचे अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...'

राज ठाकरेंकडे जैन धर्मगुरूंनी केली ‘ही’ मागणी; म्हणाले, ‘बाळासाहेबांचे अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न…’

Subscribe

ठाणे : अखंड हिंदुस्थान हे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि ते राज ठाकरे आपण साकार करावे, अशी मागणी वजा कळकळीची अपेक्षा ठाण्यात शनिवारी जैन धर्मगुरूंनी बोलून व्यक्त केली.राज ठाकरे यांच्या आगमन ठाण्यातील टेंभीनाका येथील जैन धर्मियांच्या मंदिरामध्ये होताच, जय जय महाराष्ट्र माझा आणि आया है राजा अशी मराठी गीते लावून जंगी स्वागत केले. राज यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर ते मंदीरामधील सभा मंडपातील कार्यक्रमस्थळाला त्यांनी भेट दिली.

ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय असून येथून आता बा‌ळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कामकाज चालते. त्यामुळे टेंभीनाका परिसर हा संपुर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या भागात समाजाचे मोठे मंदीर आहे. या मंदीरामध्ये जैन समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी ८ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीती लावली. त्यांच्या स्वागतासाठी जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने मंदीर परिसरात उपस्थित होता.

- Advertisement -

याप्रसंगी कार्यक्रमात बोलताना,जैन धर्मगुरु आचार्य चितानंद महाराज यांनी आमची राज ठाकरे यांच्याकडून एक अपेक्षा आहे. ही अपेक्षा छोटी नाहीतर खूप मोठी आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि भारताबद्दल बोलत नाही तर अखंड हिंदुस्थान हे आमचे स्वप्न आहे. कश्मीर अर्धा आपल्या ताब्यात आला आहे. आम्हाला पूर्ण कश्मीर हवा आहेच. पण, त्याचबरोबर पाकिस्तानही हवा आहे. अखंड हिंदुस्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते. हे स्वप्न तुम्ही पुर्ण करा. त्यासाठी आता आम्ही तुमचे स्वागतही केले आहे, असे ते म्हणाले.


सुनील धामणेंची हकालपट्टी करा, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा; किरीट सोमय्यांची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -