घरमहाराष्ट्रपुणेत्यांना कामातून उत्तर देऊ; दावोस गुंतवणुकीच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

त्यांना कामातून उत्तर देऊ; दावोस गुंतवणुकीच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

Subscribe

दावोस येथील गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत गेले होते. दावोस १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणुकीचे करार झाले आहेत. त्यामुळे एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती.

पुणेः दावोस येथे गुंतवणुकीचे करार झालेल्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत. मग त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय होती, असा आरोप विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोध करण्याशिवाय विरोधकांकडे दुसरे काहीच काम नाही. त्यांना विरोध करु द्या. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ.

दावोस येथील गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत गेले होते. दावोस १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणुकीचे करार झाले आहेत. त्यामुळे एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. दावोसमधून महाराष्ट्रासाठी काही येत असेल तर चांगलेच आहे. पण आधी महाराष्ट्राबाहेर गेलेले कोट्यवधींचे उद्योग परत आणा, अशी टीका विरोधकांनी केली होती.

- Advertisement -

तसेच दावोस येथे करार झालेल्या सर्व कंपन्या महाराष्ट्रातीलच होत्या. त्यांच्याशी करार करायचा होता. मग त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय होती, असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर करण्यात आला. पिपंरी चिंचवड येथे वसंतदादा साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे हे तेथे गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना दावोस येथील गुंतवणुकीबाबत होत असलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना किती आरोप करायचे ते करु द्या. त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरे काहीच काम नाही. आम्ही आमच्या कामातून त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ. केवळ आकडेवारी वाढवण्यासाठी आम्ही करार केलेले नाहीत. करार केलेले उद्योग राज्यात सुरु होतील. मी मुख्यमंत्री होण्याआधी झालेल्या गुंतवणुकीचे काय झाले यावर मला बोलायचे नाही. दावोस येथे गेलेली टीम परतल्यानंतर कुठे किती गुंतवणूक झाली हे स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -