घरदेश-विदेशपरमवीर चक्रविजेत्यांच्या नावाने ओळखले जातील 'या' 21 बेटांची नावं

परमवीर चक्रविजेत्यांच्या नावाने ओळखले जातील ‘या’ 21 बेटांची नावं

Subscribe

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 126 वी जयंती आहे. याचं निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबारमधील 21 मोठ्या बेटांचे नामकरण केले. गृहमंत्री अमित शाह 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पोर्ट ब्लेअरला पोहोचले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्धाटन केल्यानंतर देशाला संबोधित केले.

यावेळी नरेंद्र मोदींनी ही 21 बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जातील. असे सांगितले तसेच भारतातील विविध युद्धांमध्ये आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या 21 वीर जवानांची नावे या बेटांना देण्यात आली आहेत.

- Advertisement -

आयलँड    आयलँडचे नवे नाव

INAN 370   सोमनाथ द्वीप
INAN 308   करम सिंह द्वीप
INAN 474   राणे द्वीप
INAN 198   जदुनाथ द्वीप
INAN 374   पीरू द्वीप
INAN 419   सलारिया द्वीप
INAN 646   धन सिंह द्वीप
INAN 414   जोगिंदर द्वीप
INAN 255   शैतान सिंह द्वीप
INAN 571   अब्दुल हमीद द्वीप
INAN 565   तारापोर द्वीप
INAN 276   अलबर्ट एक्का द्वीप
INAN 287   होशियार द्वीप
INAN 297   खेत्रपाल द्वीप
INAN 377   सेखों द्वीप
INAN 421   परमेश्वरन द्वीप
INAN 293   बाना द्वीप
INAN 417   विक्रम बत्रा द्वीप
INAN 306   मनोज पांडे द्वीप
INAN 536   संजय द्वीप
INAN 193   योगेंद्र द्वीप

- Advertisement -

या 21 बेटांचे नामकरण केल्यानंतर देशाला संबोधित करत म्हणाले की, “येणाऱ्या अनेक पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. ही बेटं आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान असतील. स्वातंत्र्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”

 


हेही वाचा :

अंदमान-निकोबारमधील ‘ही’ बेटं परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जाणार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -