घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारात वाढ; आशिष शेलारांची पत्राद्वारे फडणवीसांकडे चौकशीची मागणी

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारात वाढ; आशिष शेलारांची पत्राद्वारे फडणवीसांकडे चौकशीची मागणी

Subscribe

सध्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पालिकेच्या एकूण २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सामवेश असून, त्यापैकी भ्रष्टाचाराच्या १४२ प्रकरणांत एसबीतर्फे चौकशी सुरू आहे.

सध्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पालिकेच्या एकूण २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सामवेश असून, त्यापैकी भ्रष्टाचाराच्या १४२ प्रकरणांत एसबीतर्फे चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालिकेतील भ्रष्टाचाराबाबच चौकशीचे निर्देश दिले आहेत. आशिष शेलार यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. (Increase in corruption in Mumbai Municipal Corporation bjp leader Ashish Shelar letter to Fadnavis demanding an inquiry)

आशिष शेलारांचे फडणवीसांना पत्र

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसेंगणिक वाढत चालले आहेत. या भ्रष्ट व्यवहारांविरोधात चौकशी करण्यासाठी एसीबीने गेल्या ४ वर्षात अनेकदा पालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तब्बल ३७७ वेळा एसीबींना परवानगी नाकारल्याचे माध्यामांतील बातम्यांतून समोर आले आहे.

अजुनही पालिका अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारी संदर्भात १८ परवानगी पत्र हे आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग अधिकारी राधाकृष्णन वाळुंजे यांच्या सासऱ्यांना कोविड काळामध्ये मोठी कंत्राटे दिली गेली. या प्रकरणातही पालिका आयुक्तांनी एसीबीला चौकशीसाठी परवानगी देण्यास नाकारली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई न करता खाते अंतर्गत (डिपार्टमेंन्टल) चौकशीही बंद करत फाईल बंद केली आहे.

- Advertisement -

सर, तुमच्या पाठिंब्यामुळे यापूर्वी आम्ही मुंबई महानगरपालिकेमधला सफाई घोटाळा आणि निकृष्ट दर्जाचे रस्ता बांधणीचा घोटाळा उघडकीस आणला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत आणि कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमधल्या भ्रष्टाचारी व्यवहारांनी उच्चांक गाठला आहे. गेल्या २५ वर्षात मुंबई महानगरपालिकेमधला अंदाधुंदी कारभार, भ्रष्ट व्यवहार व निकृष्ट दर्जाच्या पायाभूत सोई-सुविधांमुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. माफिया स्टाईल पद्धतीने उद्धवजींची शिवेसेनाच पालिकेचा पूर्ण कारभार पाहत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना सांभाळत आहे. मात्र, माफिया प्रशासनाची व भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांची मनमानी आता यापुढे खपवून घेतली जाणार नाही यासाठी राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी आम्ही विनंती करतो. यासाठी आपण मुंबई माहनगरपालिकांना पुढील निर्देश द्यावेत, अशी विनंती करतो.

  • एसीबी कडून प्रलंबित असलेल्या १८ चौकशी पत्र व यापूर्वीच्या ३७७ चौकशी पत्रांना तात्काळ परवानगी द्यावी.
  • प्रभाग अधिकारी राधाकृष्णन वाळुंजे यांच्या विरोधातही एसीबी चौकशीला परवनागी द्यावी व डिपार्टमेंन्टल चौकशीही पुन्हा सुरूवात करावी.

मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या सेवेसाठी आहे, भ्रष्ट कंत्राटदारांचे हित जोपासण्यासाठी नाही याची जाणिव करून देताना पालिकेतील भ्रष्ट व्यवस्था मूळापासून नष्ट करण्यासाठी आपण घेत असलेल्या निर्णयांबद्दल सर्व मुंबईकरांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो.


हेही वाचा – चित्रा वाघांचा आता सुळेंवर निशाणा; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, काय वेळ आलीय बघा!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -