घरदेश-विदेशमाईंड रीडर सुहानी शाहापेक्षा मी वेगळा, धीरेंद्र शास्त्रींनी कारणांसहित केलं स्पष्ट

माईंड रीडर सुहानी शाहापेक्षा मी वेगळा, धीरेंद्र शास्त्रींनी कारणांसहित केलं स्पष्ट

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून नियमित चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची माईंड रीडर सुहानी शाह हिच्यासोबत तुलना केली जातेय. सुहानी शाहसुद्धा लोकांच्या मनातील भावना ओळखत असल्याचं सांगितलं जातंय. पण, आपण सुहानी शाह यांच्यापेक्षा वेगळे असल्याचा दावा धीरेंद्र महाराज यांनी केला आहे.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या शिबिराला तुफान गर्दी असते. तसंच, भाविक त्यांना चमत्कारी बाबा म्हणूनही संबोधतात. भाविक एका कागदावर त्यांची समस्या लिहून देतात. भाविक त्या समस्येवर उपायही सांगतात, असा दावा केला जातोय. शिवाय, भूतबाधाही या बाबाकडून काढली जाते. चमत्कारांचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना अंनिसचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी त्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गट-भाजपासोबतच्या युतीत डावललं जातं, अखेर आठवलेंनी व्यक्त केली खंत

धीरेंद्र शास्त्रींचा हा चमत्कार प्रसिद्धीझोतात आल्यानंतर माईंड रीडर सुहानी शाहासोबत या चमत्कारांची तुलना होऊ लागली. सुहानीकडेही लोकांच्या मनातील विचार ओळखण्याची कला आहे. मात्र, आपण सुहानीपेक्षा वेगळे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, “सुहानीला हे सगळं करण्यासाठी विचार करावा लागतो. एखाद्याच्या मनातलं ओळखण्यासाठी तिला समोरच्याचे डोळे बंद ठेवावे लागतात. मनातल्या मनात त्या व्यक्तीचं जोरजोरात नाव घ्यायला सांगितलं जातं. हे सर्व ओळखण्यासाठी तिला तीन सेकंदाचा कालावधी लागतो. माईंड रीडरसाठी या गोष्टी हव्या आहेत. पण आम्हाला तर ही कुठली गोष्ट नकोच आहे. आम्ही म्हणतो की आम्ही आधीच कागदावर एक माहिती लिहून ठेवतो. तुम्ही हव्या त्या व्यक्तीला घेऊन या. ती माहिती त्याच व्यक्तीची असेल.”

हेही वाचा – कसबा, पिंपरीतील पोटनिवडणुकीबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – बिनविरोध…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -