घरभक्तीMagh Purnima 2022 : माघ पौर्णिमेचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या खास...

Magh Purnima 2022 : माघ पौर्णिमेचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या खास संयोग

Subscribe

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला माघ पौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात कार्तिक आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नान केले जाते. या दिवशी गंगा काठी मोठा उत्सव आयोजित केला जातो. भाविक तिथे जाऊन पूजा, जप, तप आणि दान करतात. पौर्णिमेच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजा, आराधना आणि दान केल्यास आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते.

माघ पौर्णिमा तिथी
यंदा रविवार 5 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाईल.
माघ पौर्णिमा प्रारंभ : 4 फेब्रुवारी रात्री 9:29 पासून
माघ पौर्णिमा समाप्ती : 5 फेब्रुवारी रात्री 11:58 पर्यंत

- Advertisement -

माघ पौर्णिमेचा खास संयोग
यंदा माघ पौर्णिमेच्या दिवशी आयुष्मान योग आणि सौभाग्य योग हे दोन अद्भूत संयोग बनणार आहेत. आयुष्मान योग 5 फेब्रुवारी दुपारी 2:42 पर्यंत असेल त्यानंतर सौभाग्य योग सुरु होईल. तसेच या दिवशी रवि पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धि योग देखील असेल. ज्यामुळे हा दिवस खूप खास असेल.

माघ पौर्णिमेचे महत्त्व
सनातन धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्यास पापातून मुक्ती मिळते असा धारणा आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते असे म्हटले जाते. शास्त्रानुसार, माघ पौर्णिमेला भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात वास्तव्यास असतात. त्यामुळे या दिवशी गंगेच्या पाण्याचा आपल्याला स्पर्श झाल्यास स्वर्ग प्राप्ती होते असे म्हटले जाते.

- Advertisement -

Magh Purnima 2022 | आज है 'माघी पूर्णिमा', जानें पूजा की तिथि, सही मुहूर्त  और गंगा-स्नान का महत्व | Navabharat (नवभारत)

या दिवशी गंगेच्या किनारी एका मेळाव्याचे आयोजन केले जाते. अनेकजण माघ महिन्यात गंगेच्या किनारी वास्तव्याला राहतात. गंगेच्या किनारी वास्तव्यास असलेल्या लोकांना अन्न आणि वस्त्र दान केल्याने पुण्य मिळते त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान केले पाहिजे असे सांगितले जाते.


हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये घंटी वाजवण्याचे आहेत अनेक चमत्कारी फायदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -