घरमनोरंजन'झिरो'च्या सेटवरील श्रीदेवींचा अखेरचा फोटो व्हायरल

‘झिरो’च्या सेटवरील श्रीदेवींचा अखेरचा फोटो व्हायरल

Subscribe

श्रीदेवींचा हा अखेरचा फोटो शेअर करताना करिश्मा कपूरने 'झिरो' चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 

‘हवा हवाई’ अभिनेत्री श्रीदेवी यांचे यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये निधन झाले. आजही बॉलीवूडमध्ये आणि श्रीदेवींच्या तमाम चाहत्यांमध्ये त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. श्रीदेवी यांचा तगडा अभिनय आणि त्याचं दिलखेचक नृत्य कधीही विसरता येणार नाही. दरम्यान, बॉलीवूडची ‘लोलो’ अर्थात करिश्मा कपूरने नुकतीच श्रीदेवींबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. करिश्माने शेअर केलेला श्रीदेवींचा हा फोटो शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटाच्या सेटवरील आहे. हा फोटो शेअर करताना करिश्मा कपूरने ‘झिरो’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ‘झिरो’ चित्रपटात करिश्माने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. ‘झिरो’च्या निमित्ताने काही वेळ मला माझ्या आवडत्या अभिनेत्रीसोबत अर्थात श्रीदेवींसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी झिरोच्या टीमचे आभार मानले आहेत. श्रीदेवी यांनीही झिरो चित्रपटात पाहुण्या अभिनेत्रीच्या भूमिकेत काम केलं आहे.

- Advertisement -

आज देशभरात ‘झिरो’ रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला पंसती मिळते आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत सलमान खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ, काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकाण आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री श्रीदेवी देखील या चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -