घरअर्थजगतअदानी ग्रुपला आणखी एक झटका; सिमेंट कंपनी अदानी विल्मरच्या गोदामांवर छापे

अदानी ग्रुपला आणखी एक झटका; सिमेंट कंपनी अदानी विल्मरच्या गोदामांवर छापे

Subscribe

आता कुठे तरी अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १४ टक्क्यांनी मजबूत झाल्याने गौतम अदानींना दिलासा वाटू लागला होता, पण तितक्यात अदानी ग्रुपला आणखी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

Adani Wilmar Raided : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर अदानी ग्रुपमागे जी संकटाची साखळी तयार झाली आहे, ती काही संपण्याचं नाव घेत नाही. एकीकडे हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी ग्रुपला करोडोंचे नुकसान सहन करावे लागले. आता कुठे तरी अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १४ टक्क्यांनी मजबूत झाल्याने गौतम अदानींना दिलासा वाटू लागला होता, पण तितक्यात अदानी ग्रुपला आणखी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बुधवारी उत्पादन शुल्क आणि कर विभागाने अदानी ग्रुपच्या हिमाचल प्रदेशातील गोदामांवर छापा टाकला. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी पथकाने परवानू येथील अदानी विल्मरच्या स्टोअरवर छापा टाकला. यानंतर रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे शोधण्याचे काम सुरू होते.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी गोदामातील साठ्याची तपासणी केली आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. तपासात रोखीने कर दायित्व न भरणे संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत गोदामांमधील कागदपत्रांची तपासणी सुरू होती. अदानी समूहाच्या एकूण ७ कंपन्या हिमाचलमध्ये कार्यरत आहेत. फळांच्या शीतगृहांव्यतिरिक्त अदानी समूहाच्या कंपन्या राज्यात मोठ्या प्रमाणात किराणा मालाचा पुरवठा करतात. राज्यातील नागरी पुरवठ्याबरोबरच अदानी समूह पोलिस विभागालाही वस्तूंचा पुरवठा करते. सरकारी विभागांना वस्तू पुरवठ्यासाठी अदानी समूहासोबतचे बहुतांश करार हे आधीच्या भाजप सरकारच्या काळात झाले.

- Advertisement -

हिमाचलमधील सत्ताबदलानंतर सध्याचे काँग्रेस सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संबंध फारसे चांगले चालले नाहीत. मालवाहतूक शुल्कावरून ट्रक ऑपरेटर्ससोबत झालेल्या वादामुळे अदानी समूहाने हिमाचल प्रदेशातील आपल्या दोन्ही सिमेंट प्लांटमध्ये दोन महिन्यांपासून उत्पादन थांबवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -