घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर; गांधी विचारांवरून फडणवीसांचा काँग्रेसवर टीका

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर; गांधी विचारांवरून फडणवीसांचा काँग्रेसवर टीका

Subscribe

काँग्रेसने गांधीजींना गांधी टोपीपुरतंच मर्यादित ठेवलं, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे निलंगा येथे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील याठिकाणी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच भाजपचे आमदार आणि दिवंगत शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे दोघेही या व्यासपीठावर उपस्थित असल्याने या दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे टोले लगावले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधी विचारांवरून मंचावर उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांच्यावर टीका केली. त्याआधी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्या कार्यक्रमात परिधान केलेल्या शिवाजीराव पाटील यांच्या टोपी आणि जॅकेटबद्दल भाष्य केले होते. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, दिवंगत शिवाजीराव हे काँग्रेसच्या विचारांचे होते. त्यांनी कायमच सभागृहात काँग्रेसची पाठराखण केली. निलंगा मतदारसंघाने त्यांना 10 वेळा निवडणून देण्याचा विक्रम केला. पण मला आनंद होत आहे की, संभाजराव पाटील निलंगेकर यांनी शिवाजीराव पाटील यांचे टोपी आणि जॅकेट घातले आहे.

- Advertisement -

जयंत पाटील पुढे म्हणाले की, शिवाजीरावांची ही गांधी विचारांची टोपी आहे. या टोपीने भारताला गांधी विचारांनी कसे विकासाच्या दिशेने न्यायचे हे सांगितले. तो गांधी विचार आज पुन्हा एकदा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या डोक्यावर चढला हे पाहून आनंद झाल्याचे वक्तव्य यावेळी त्यांनी व्यक्त केले. तर देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मंत्री पदाच्या आड ही टोपी येणार नाही, असा टोला त्यांनी संभाजी निलंगेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

हेही वाचा – पाकिस्तानात इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकट; IMF कडून 14 वेळा घेतलेल्या कर्जाची अद्याप परतफेड नाही

- Advertisement -

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जयंत पाटील यांना प्रत्यत्तर दिले. गांधी विचारानेचं हा देश समृद्ध होईल. मात्र, तुम्ही गांधीजींना टोपीपुरते मर्यादित ठेवले आहे. त्यामुळे ही गांधी टोपी संभाजी पाटील यांना घालून तो विचार कसा पुढे नेता येईल, यासाठी हा प्रयत्न करावा लागला. म्हणूनच त्यांना शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे जॅकेट आणि टोपी घातलेली आहे. त्यामुळे काही हरकत नाही. ही केवळ विचाराची टोपी आणि विचाराचे जॅकेट नाही तर विकासाची टोपी आणि विकासाचे जॅकेट आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली. दरम्यान, यावेळी या कार्यक्रमामध्ये सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -