घरमनोरंजनबोनी कपूर यांनी केली श्रीदेवीच्या 'श्रीदेवी द लीजेंड' बायोग्राफीची घोषणा

बोनी कपूर यांनी केली श्रीदेवीच्या ‘श्रीदेवी द लीजेंड’ बायोग्राफीची घोषणा

Subscribe

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला या जगाचा निरोप घेऊन 5 वर्ष झाली. मृत्यूच्या इतक्या वर्षानंतरही श्रीदेवी चाहत्यांच्या स्मरणात आहे. श्रीदेवीचे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. अशातच, श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या ‘श्रीदेवी द लिजेंड’ या बायोगाफ्रीची घोषणा केली आहे. श्रीदेवीच्या जीवनावर आधारित हे पुस्तक 2023 मध्ये पल्बिश होणार आहे. ‘श्रीदेवी द लेजेंड’ हे पुस्तक लेखक धीरज कुमार यांनी लिहिलेलं असून बोनी कपूर यांनी ट्वीटरवर याची घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

- Advertisement -

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले की, “श्रीदेवी प्रकृतीची शक्ती होती. पडद्यावर तिच्या चाहत्यांसोबत तिची कलाकुसर शेअर करताना तिला सर्वात जास्त आनंद झाला, ती एक निडर व्यक्ती होती. धीरज कुमार हे एक असे व्यक्ती आहेत ज्यांना ती घरचं समजायची. ते संशोधक, लेखक आणि स्तंभलेखक आहेत. आम्हाला आनंद होत आहे की ते एक पुस्तक लिहित आहेत जे त्यांच्या असाधारण जीवनाला अनुकूल आहे.”

श्रीदेवींच्या बायोग्राफी ‘श्रीदेवी द लिजेंड’मध्ये तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याबाबत चर्चा केली जाईल. श्रीदेवीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. श्रीदेवीने 1978 मध्ये ‘सोलवन सावन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवीचे वयाच्या 55 व्या वर्षी यांचे निधन झाले.

- Advertisement -

 


हेही वाचा :

शाहरुख खान आणि गौरीमध्ये झाला वाद; भांडणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -