घरमनोरंजनशाहरुख खान आणि गौरीमध्ये झाला वाद; भांडणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

शाहरुख खान आणि गौरीमध्ये झाला वाद; भांडणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपे शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी हे दोघे जेव्हा कधी एकत्र दिसतात, त्यावेळी सर्वांच्या नजरा या दोघांवरच खिळलेल्या असतात. यांच्यामध्ये कधीच वाद होत नाही असेच सर्वांना वाटते. पण नुकतंच सोशल मीडियावर या दोघांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

पठाण चित्रपटामुळे पुन्हा एकदा शाहरुख खान चर्चेत आला आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामुळे वाद निर्माण झाले होते. पण हा चित्रपट हजार कोटींच्या गल्ल्यामध्ये लवकरच प्रवेश करणार आहे. शाहरुख जितका प्रसिद्ध आहे, तेवढीच त्याची पत्नी गौरी देखील प्रसिद्ध आहे. हे स्टार कपल जेव्हा कधी एकत्र प्रसार माध्यमांच्या समोर येतं, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. पण या स्टार कपलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख गौरीला झापताना दिसून येत आहे.

शाहरुख आणि गौरीच्या भांडणाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहरुख झोपण्याच्या पद्धतीवरून गौरीशी भांडत आहे. याचवेळी निर्माता आणि शाहरुखचा मित्र करण जोहर सुद्धा त्याठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. पण तो हे भांडण थांबवायचे सोडून भांडण वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

“यार गौरी, ही गोष्ट सोडून देणे तुझ्या भल्याचं आहे. मला इतकी वर्ष ओळखतेस तरीही माझ्या स्लीप पॅटर्नवर बोलत आहेत. तू रिलॅक्स कर यार. मी 44 वर्षांचा आहे. इतकं तर स्वत: स्वतःला सांभाळू शकतो. करण म्हणतोय की, तुझी सगळी चिंता खोटी आहे. माझी आर्थिक परिस्थिती तुला माहिती आहे, त्यामुळे शॉपिंग कमी करत जा. तर मध्येच करण त्याला म्हणतोय की, शॉपिंग बंद कर”

दरम्यान, गौरी आणि शाहरुखच्या भांडणाचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण यामध्ये गौरी नेमकी शाहरुखला काय बोलतेय हे कळू शकलेले नाही. पण त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे दिसत आहे. याआधी देखील शाहरुख आणि गौरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडमधील ऑफ-स्क्रीन जोड्यांमधील शाहरुख आणि गौरी यांची अशी जोडी आहे ज्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यात येतो.

- Advertisement -

हेही वाचा – राजस्थानातील 500 वर्षे जुन्या वाड्यात पार पडलं स्मृती इराणींच्या लेकीचं लग्न

शाहरुख आणि गौरी गेल्या 32 वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. तो कायमच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येतो. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन याला अंमली पदार्थ घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हा देखील शाहरुखला ट्रोल करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -