घरताज्या घडामोडीवंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळणार अधिक गती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळणार अधिक गती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

रेल्वेच्या सर्व क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी विशेष म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक कनेक्टिविटीसाठी महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदाच दोन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. या ट्रेन मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील. यामुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरी, भाविक आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले.आजच्या मुंबई दौऱ्यात मोदींनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांशी संवाद साधताना मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थयात्रेसाठी या ट्रेनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

मुंबई-सोलापूर या वंदे भारत ट्रेनमधून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी, सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना या ट्रेनचा प्रवास करणं सोयिस्कर होणार आहे. जेव्हा हीच ट्रेन सह्याद्रीच्या कुशीतून जाईल तेव्हा प्रवाशांना निसर्गाचे सौंदर्य देखील बघायला मिळेल. मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांना या नवीन वंदे भारत ट्रेनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो.

- Advertisement -

ही वंदे भारत ट्रेन भारताच्या विकासवेगाचं प्रतिक आहे. भारत देश मोठ्या प्रमाणात आणि वेगात वंदे भारत ट्रेन लॉन्च करत आहे. आतापर्यंत दहा ट्रेन देशभरात धावत आहेत. आर्थिक राजधान्यांना या ट्रेन जोडल्या जाणार आहेत. मोठ्या गतीने देशात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. देशातील १७ राज्यातील १०८ जिल्ह्यात वंदे भारत ट्रेन कनेक्ट आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा :  वंदे भारत ट्रेन भाविकांसाठी मैलाचा दगड ठरेल : देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -