घरताज्या घडामोडीअहमदनगर DCC बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

अहमदनगर DCC बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

Subscribe

अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके (४६) यांचे शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके (४६) यांचे शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. अ‍ॅड. उदय शेळके यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता त्यांचे मूळ गाव पिंप्री जलसेन येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. ()

पाच महिन्यांपूर्वी अ‍ॅड. उदय शेळके यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होती.

- Advertisement -

लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ते बेशुद्धावस्थेतच होते. मात्र शनिवार ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आले.

उदय शेळके हे दिवंगत अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जीएस महानगर बँक या दोन बलाढ्य बँकांच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोध पक्षनेते अजित पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते.

- Advertisement -

गुलाबराव शेळके यांचेही निधन हृदयविकारानेच झाले होते. त्यांच्यानंतर अ‍ॅड. उदय शेळके यांनी जीएस महानगर बँकची धुरा सर्थपणे सांभाळली. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अ‍ॅड. उदय शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.


हेही वाचा – अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, पण स्मरण उद्धव ठाकरेंच्या संकल्पाचे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -