घरदेश-विदेशशशिकांत पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेऊ, भाई जगताप यांचे आश्वासन

शशिकांत पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेऊ, भाई जगताप यांचे आश्वासन

Subscribe

मुंबई – अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाज्यासाठी सातत्याने धडपड करणारे ज्येष्ठ समाजसुधारक व मराठा समाजाचे नेते दिवंगत ॲड. शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची त्यांच्या योगदानाची नवीन पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने यथोचित स्मारक उभारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज येथे केले. पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध संघटना व संस्थानी आयोजित केलेल्या शिवाजी मंदिर सभागृह दादर येथील शोकसभेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ख्याती होती. शाहू, फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे नेते अशीही त्यांची प्रतिमा कायम राहिली. प्रकृती ठीक नसताना ते रत्नागिरी येथे मराठा बिझनेसमन फोरमच्या बैठकीसाठी गेले होते. खरे तर त्यांची प्रकृती व वय पाहता त्यांनी असे दौरे करू नयेत, असा सल्ला डॉक्टर व आप्तेष्ट यांनी दिला होता. पण ते थांबले नाहीत. अखेर त्यांचा प्रवास कायमचा थांबला. ही बाब संपूर्ण समाजाला व आम्हा सर्वांना वेदना देणारी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पवार यांनी निव्वळ राज्यात नाही तर संपूर्ण देशभर मराठा समाजासाठी काहीतरी चांगले काम करावे यासाठी दौरे केले. ज्या ज्या राज्यात मराठा समाज होता त्या ठिकाणी ते पोहोचले व समाज एकत्र करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्याचे हे योगदान देशभरातील समाज कधीच विसरू शकणार नाही. असेही जगताप यांनी या वेळी बोलताना सांगितले.

या शोक सभेचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, शिवाजी मंदिर,मराठा बिझनेसमेन फोरम तसेच मुंबई व राज्यातील अनेक मराठा संघटना यांनी केले होते.

- Advertisement -

या वेळी राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड उज्वल निकम, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरशोत्तम खेडेकर, माजी खासदार कर्नल सुधीर सावंत, शिवाजी मंदिरचे अण्णासाहेब सावंत,नाशिक जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, सावंतवाडी संस्थानचे अध्यक्ष इंद्रजित सावंत, निवृत्त न्यायमूर्ती उमेश साळवी, इडीचे डेप्युटी डायरेक्टर उज्वल चव्हाण, शिवसेनेचे विनोद घोसाळकर, शिवसंग्रामचे तानाजी शिंदे, खेड तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष केशवराव भोसले, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव,मराठा फेडरेशनचे सुरेश सुर्वे, मराठा बिझनेसमेन फोरमचे राजेंद्र सावंत, मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांच्या सह राज्यातील अनेक नेते, पवार कुटुंबीय व विविध संघटचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -