घरताज्या घडामोडीशिवसेना भवन वाद : शिवाई ट्रस्टविरोधात यशस फर्मची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

शिवसेना भवन वाद : शिवाई ट्रस्टविरोधात यशस फर्मची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

Subscribe

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निकाला निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंद गट व ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, शिवसेना भवनावरून दोन्ही गटात वाद सुरू झाला आहे.

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निकाला निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंद गट व ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, शिवसेना भवनावरून दोन्ही गटात वाद सुरू झाला आहे. अशातच शिवसेना भवनची मालकी असलेल्या शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (shivsena crisis maharashtra cm eknath shinde starts shivsena takeover process)

ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर केल्याचा आरोप यशस फर्मकडून करण्यात आला आहे. यशस फर्मच्या योगेश देशपांडे यांनी शिवाई ट्रस्टविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह त्यानंतर आता शिवसेना भवनही उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना भवनावरील वादाला सुरूवात झाली. दरम्यान, शिवसेना भवन शिवाई ट्रस्टचं आहे का आणखी कुणाचं? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यातल्या कागदपत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव दिसत आहे.

पार्टी फंड आणि बँक अकाउंटवर दावा करणार नसल्याचे शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी म्हटले. तसेच, ‘घटनेनुसार व नियमानुसारच आम्ही सर्वकाही करत आहोत. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो की, आम्हीच खरी शिवसेना आहोत. तसेच, निवडणूक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केले आहे’, असे शिंदे गटातील एका कॅबिनेट मंत्र्याने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – फोटोवरून कर्नाटकच्या महिला IAS-IPS अधिकाऱ्यांमध्ये वाद; गृहमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -