घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मुख्यमंत्र्यांचे चहापानाचे बिल दोन कोटींपेक्षा जास्त, त्यात काय... अजित पवारांचा सवाल

मुख्यमंत्र्यांचे चहापानाचे बिल दोन कोटींपेक्षा जास्त, त्यात काय… अजित पवारांचा सवाल

Subscribe

मुंबई – मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान (Official Residence of the Chief Minister) असलेल्या वर्षा बंगल्यात (Varsha bungalow) केवळ खानपानाचे बिल (Food and Tea Bill) २ कोटी ३८ लाख रुपये आले असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर हे बिल अवघ्या चार महिन्यांचं आहे. त्यामुळे चहामधून सोन्याचं पाणीही प्यायला देतात का? असा सवालच अजित पवारांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाहीय. पण एसटीच्या जाहिराती पानभर केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जाहिरातीसाठी मुंबई पालिकेच्या तिजोरीतून १७ कोटींचा खर्च करण्यात आलाय. तर दुसरीकडे वर्षा बंगल्यावर चहापानासाठी अवघ्या चार महिन्यांत २ कोटींचा खर्च केला जातोय, यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

जिल्हा नियोजन समितीमार्फत होणारी कामं होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामीण भागासाठी निधी मंजूर केला जातो. मात्र, कामेच केली नसल्याने हा निधी पुन्हा परत जाणार आहे, असंही अजित पवार म्हणाले. असं असताना सरकारकडून उधळपट्टी सुरू आहे. रोज अडीच लाखांचा खर्च येत असल्याचं गणितही बाजूला बसलेल्या छगन भुजबळ यांनी यावेळी मांडलं.

गेल्या आठ महिन्यांत सरकारकडून जाहिरांतीवर ५० कोटी रुपये खर्च झाला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून माहिती घेतली तेव्हा समजलं की तिथून जाहिरातींवर खर्च करण्यासाठी १७ कोटी घेण्यात आले आहेत. म्हणजे तुमचा खर्च, तुमचे हसरे फोटो दाखवण्याकरता जनतेच्या पैशांची उधळपट्टी करतात, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

चहापानावर बहिष्कार

गेल्या आठ-नऊ महिन्यांत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचं काम अत्यंत सुमार आणि महाराष्ट्राला मान खाली घालणारं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून तुम्ही मराठी माणसाचा अभिमान बिंदू असलेली शिवसेना फोडली आणि त्यांचं चिन्ह तुम्ही घेतलं, याचा राग जनतेच्या मनामध्ये आहे. गेल्या आठ महिन्यात ज्या वेगाने तुम्ही तुमची निष्ठा बदलली याचा राग शिवसैनिकांना आहे. बाळासाहेब ठाकरेंना माणनाऱ्या जनतेच्या मनात राग आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासमोरील आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष शिवसेनेसोबत भक्कमपणे आहोत, हे आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने सांगतो. यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचं रक्षण करण्याची ताकद राहिलेली नाही. त्यामुळे आम्हाला आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चहापानाला बोलावलं होतं. त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता. महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा ठरली असती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही, त्यामुळे आम्ही एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -