घरदेश-विदेशLive Update : शिवसेना- भाजपा आमदारांची उद्या सकाळी १० वाजता बैठक

Live Update : शिवसेना- भाजपा आमदारांची उद्या सकाळी १० वाजता बैठक

Subscribe

शिवसेना- भाजपा आमदारांची उद्या सकाळी १० वाजता बैठक


मनीष सिसोदियांना अटक केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे मुंबईत आंदोलन

- Advertisement -

आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड


दुपारी १ वाजेपर्यंत मेघालयमध्ये ४४.७३ टक्के, तर नागालँडमध्ये ५७.०६ टक्के मतदान

- Advertisement -

राज्यपालांच्या अभिभाषणातून दिशाभूल केली – आदित्य ठाकरे


आजची विधानसभा सभागृहाची बैठक 12.42 मिनिटांनी स्थगित झाली असून उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल


तालिका अध्यक्ष निवड

आमदार योगेश सागर, संजय शिरसाट, सुनील भुसारा आणि सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्षपदी निवड

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली घोषणा


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या- छगन भुजबळ

विधिमंडळ अर्थसंकल्पाच्या कामकाजाला सुरुवात

छगन भुजबळ – दक्षिण भारतात सात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. साडेचारशे विद्यापीठात मराठी शिकवली जाईल. आमची भाषा जुनी असूनसुद्धा दर्जा मिळालेला नाही.

आशिष शेलार – आज मराठी भाषा गौरव दिन आहे. कुसुमाग्रजांची जयंतीही साजरी करतो. भारताबाहेरही या दिवसाला साजरा करतात. यानिमित्ताने जगभरात भावना सारखी आहे. मराठी बोलीभाषापुरती न राहता ज्ञानभाषा आणि अभिजात भाषेचा दर्जा व्हावा याकरता आमचं १०० टक्के समर्थन आहे. दिल्लीत असलेल्या बाबूंकडे काही गोष्टी परखडपणे मांडल्या आहेत. २०१७-१८ मध्ये तत्कालीन मंत्र्यांना भेटून केंद्राने गती देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीत अंतिम टप्पा गाठायचा आहे. विधानसभा, पक्ष, सगळे मिळून एकत्र गेलो पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चर्चा करून त्यांच्या नेतृत्त्वात आपण मार्चला सदर संपल्यानंतर एप्रिलमध्ये कुठलीही विदेशी ट्रीप होण्याआधी दिल्ली जावं ही विनंती.

संपूर्ण बातमी वाचा – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? आशिष शेलार म्हणाले, काम अंतिम टप्प्यात…


जय महाराष्ट्र म्हणत राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण संपले


राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

मतदान करताना फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी कारवाई


राज्यपालांच्या अभिभाषणाला हिंदीतून सुरुवात

युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र

मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना

राज्यातील १ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यास बद्ध

जी २० च्या पहिल्या बैठकीचे आयोजन केले होते, शिखल संमेलनाचे भरपूर कौतुक

वस्त्रोद्योगात सौरउर्जेचा वापर करणार, एकत्रित, स्थायी वस्त्र निती २०२३ आखणार, २०२८ पर्यंत पूर्ण करणार

मुंबई, नागपूर, पुण्यात, मेट्रो मार्ग सुरू

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मोहिम सुरू केली

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ७२ हजार दवाखाने सुरू

मुंबईत नवे १८ चिकित्सालय आणि १२३ नवे आपला दवाखाना प्रस्तावित

राज्याच्या व्यापक विकासासाठी निती आयोगाच्या धर्तीवर मित्रची स्थापना केली आहे


व्हिप मानणार नाही, आम्हाला व्हिप लागू होत नाही, अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसणार – अजय चौधरी


संजय राऊत पीएमएलएल कोर्टात हजर

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज आरोप निश्चिती होणार?


सध्याच्या राजकारणात विरोधकांच्या बाबतीत कारस्थानाचा सुगावा लागतो. देशातील वातावरण आणीबाणीपेक्षाही वाईट सुरू आहे. विरोधकांना विविध प्रकरणात गुंतवलं जातं – संजय राऊत

40 आमदार अपात्र ठरतील, याची आम्हाला खात्री

निवडणूक आयोगाने शेण खाललंय हे नक्की – संजय राऊत


अजित पवारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

ajit pawar and rahul narwekar


लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद

आंदोलक आक्रम, कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी संतप्त


सकाळी नऊ वाजेपर्यंत मेघालयमध्ये १२.६ टक्के मतदान, तर नागालँडमध्ये १५.७६


आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल

भाजपाचं उपरणं घालून मतदान केंद्रावर आल्याने कारवाई


भाजपाने चुकीचा पायंडा घातला आहे- संजय राऊत


शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी

सध्या कारवाई होणार नाही, दोन आठवड्यांनी विचार केला जाईल – प्रतोद भरत गोगावले


पश्चिम रेल्वेच्या फास्ट लोकल सुमारे 15 मिनिटे उशिराने


विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून


मेघालय आणि नागालँडमध्ये आज मतदान

दोन्ही राज्यांसह एकूण 118 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान आज पार पडणार

दोन्ही राज्यांसह 550 हून अधिक उमेदवार रिंगणात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -