घरदेश-विदेशअखेर पितळ उघडं पडलंच! इथून बनला होता कोरोना व्हायरस, अमेरिकेचा खुलासा

अखेर पितळ उघडं पडलंच! इथून बनला होता कोरोना व्हायरस, अमेरिकेचा खुलासा

Subscribe

कोरोना व्हायरस कुठून आला? याचा उगम कसा झाला? हे कोडं अद्याप काही सुटले नाही. पण अमेरिकेने एक खुलासा करत यावर या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

चीनमध्ये हाहाकार माजवणारा हा विषाणू संपूर्ण देशभर शिरकाव करतो आणि बघता बघता जगात मृत्यूचं थैमान घातलं. जगातील अनेक देशांनी कोरोनाला तोंड देण्यासाठी ‘लस’ बनवली असली तरी धोका अजून टळलेला नाही. चीनमध्येच कोरोनाने कहर केला. कोरोना व्हायरस कुठून आला? याचा उगम कसा झाला? हे कोडं अद्याप काही सुटले नाही. पण अमेरिकेने एक खुलासा करत यावर या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहानच्या लॅबमध्येच बनवण्यात आला होता. चीनने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत. पण अमेरिकन तपास यंत्रणांनी अनेक पुरावे दिले आहेत, ज्यामुळे संपूर्ण संशय धूर्त चीनच्या दिशेने बळावतो आहे.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोरोनाबाबत नवा खुलासा केला आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने म्हटलंय की, बहुधा कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधील प्रयोगशाळेतून झाली आहे. अहवालात असंही म्हटलं आहे की, ऊर्जा विभाग प्रथम व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल ठाम नव्हता. परंतू २०२१ मधल्या नॅशनल इंटेलिजेंस डायरेक्टर एव्‍हरिल हेनेसच्‍या एका अहवालात सुत्रांच्या आधारे मिळवलेली माहिती देण्यात आली.

- Advertisement -

या एजन्सीकडे उत्कृष्ट वैज्ञानिक तज्ञ आहेत. त्यामुळे हा अहवाल आणखी महत्त्वाचा आहे. ऊर्जा विभाग यूएस राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या नेटवर्कची देखरेख देखील करतो, ज्यापैकी काही प्रगत जैविक संशोधन करतात. यासोबतच गुप्तचर अहवालाद्वारे नुकत्याच झालेल्या अहवालाची माहिती देण्यात आली. इतकेच नाही तर नुकतेच व्हाईट हाऊस आणि काँग्रेसच्या प्रमुख सदस्यांनाही ते देण्यात आले आहे.

अहवालात असंही म्हटलंय आहे की कोविड-19 विषाणूचा प्रसार चीनच्या प्रयोगशाळेतूनच झाला असावा. तत्पूर्वी, एफबीआयने असेही निष्कर्ष काढले की २०२१ मध्ये चीनमधील प्रयोगशाळेत लीकमुळे कोरोना व्हायरस जगभर पसरला. २०१९ च्या उत्तरार्धात चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरस सगळ्यात आधी आढळून आला. तेव्हापासून चीनकडे त्याच्या उत्पत्तीबाबत संशयाने पाहिले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -