घरदेश-विदेश'शरद, शादाब असते तर...', नागालँड सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल ओवेसींचा पवारांवर निशाणा

‘शरद, शादाब असते तर…’, नागालँड सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल ओवेसींचा पवारांवर निशाणा

Subscribe

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीकडून पाठिंबा असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय. त्यावरून आता असदुद्दीन ओवेसी यांनी शरद पवारांवर टीका केलीय. नुकत्याच झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत NDPP-BJP युतीने नागालँडमध्ये ६० पैकी ३७ जागा मिळवून सर्वपक्षीय सरकार स्थापन केले आहे.

ओवेसींनी भाजपसोबत युतीला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, “जर ‘शरद’, ‘शादाब’ असते तर त्यांना बी टीम आणि ‘सेक्युलर’ म्हणून अस्पृश्य म्हटले गेले असते. ओवेसींनी यावेळी शरद पवारांचा खरपूस समाचार घेत म्हणाले की, “मी कधीही भाजपला पाठिंबा दिला नाही आणि कधीच पाठिंबा देणार नाही. पण राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याची ही दुसरी वेळ आहे आणि ही शेवटची वेळ असू शकत नाही. जर “शरद” शादाब असते तर त्यांना बी टीम आणि सेक्युलरांसाठी अस्पृश्य म्हटले गेले असते. ज्यांनी आपले मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले त्यांना साहेब समर्थन देत आहेत. हे मुस्लिमांचे मूल्य आहे.”

- Advertisement -

ज्यांनी आपले मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले, त्यांना साहेब पाठीशी घालत आहेत. शरद पवार यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्री नेफियू रिओ यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं जेव्हा राष्ट्रवादीचे ईशान्य प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितलं. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी ही टीका केलीय.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस नागालँड सरकारमध्ये राहून पाठिंबा देणार की बाहेरून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शरद पवार यांनी विरोधी पक्षात न जाता नेफ्यू सरकारकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात राज्यातील महाविकास आघाडी आघाडीत राष्ट्रवादी मित्रपक्ष आहे आणि भाजप हा त्यांचा कट्टर विरोधक आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची भूमिका पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. नागालँडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -