घरठाणेओहोटी कधीही लागू शकते; राज ठाकरेंचा भाजपला इशारा

ओहोटी कधीही लागू शकते; राज ठाकरेंचा भाजपला इशारा

Subscribe

मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, भरतीनंतर ओहोटी येते ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाजपनेही लक्षात घेतलं पाहिजे. आज भरती सुरु आहे. उद्या ओहोटीही येऊ शकते. राजू पाटील यांचा उल्लेख करुन राज म्हणाले, एक ही है, लेकीन काफी है. विधानसभा भरेल तेव्हा काय होईल? असाही सवाल राज यांनी केला.

ठाणेः आता जी भरती सुरु आहे. उद्या त्याला ओहोटी लागू शकते, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला गुरुवारी दिला. मला का वारंवार विचारतात की तुमचे आमदार किती निवडून आले आहेत. गेली ६० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला कधी विचारलंत का की, तुमचे आधी आमदार किती होते. आता किती आहेत, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, भरतीनंतर ओहोटी येते ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाजपनेही लक्षात घेतलं पाहिजे. आज भरती सुरु आहे. उद्या ओहोटीही येऊ शकते. राजू पाटील यांचा उल्लेख करुन राज म्हणाले, एक ही है, लेकीन काफी है. विधानसभा भरेल तेव्हा काय होईल? असाही सवाल राज यांनी केला.

- Advertisement -

पुढे राज ठाकरे म्हणाले, १३ आमदार निवडून आले होते ते काय सोरटवर आले होते का?. सभेला होणारी गर्दी मतात रुपांतरीत होत नाही. हा ठरवून केलेला प्रचार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे ६० ते ७० टोलनाके बंद झाले. एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही. ज्यांनी आपल्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्या शिवसेना-भाजपला कोणी विचारत नाही, तुमच्या घोषणेचं काय झालं? मात्र मनसेला विचारणार. हा ठरवून केलेला अपप्रचार आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसेच्या आंदोलनानंतर टेलिफोन कंपन्यांनी मराठी भाषेचा वापर सुरु केला. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावले जावे हे हातजोडून सांगितलं. ऐकलं नाही. मग हात सोडून सांगितलं, याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.

- Advertisement -

महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठीत असल्या पाहिजे यासाठी आंदोलन केले. पाट्या मराठीत झाल्या.
गुजरात, तामिळनाडू येथे कधी त्यांच्या भाषेत पाट्या लावल्या गेल्या पाहिजे, असं आंदोलन कधी ऐकलं का? महाराष्ट्रातच मराठीसाठी असं आंदोलन करावं लागतं. कारण ते तुम्हाला गृहित धरतात. स्वतःला सोकॉल्ड हिंदूत्ववादी पक्ष म्हणवतात ते या आंदोलनावेळी कुठे होते?. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेता, आमच्या या आंदोलानावेळी तुम्ही कुठे होते?, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -