घरमहाराष्ट्रपुणेसंजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक, 'या' साखर कारखान्यातील घोटाळा तपशीलासहित केला सादर

संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक, ‘या’ साखर कारखान्यातील घोटाळा तपशीलासहित केला सादर

Subscribe

Sanjay Raut Discover Sugar Factory Scam | आपणही एका साखर कारखान्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी कालच ट्वीटद्वारे केला होता. त्यानुसार, आज त्यांनी तपशीलासहित  भीमा सहकारी साखर कारखाना लि.मधील भ्रष्टाचारा उघडकीस आणला आहे.

Sanjay Raut Discover Sugar Factory Scam | मुंबई – महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक-एक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपाला आता संजय राऊत यांनी इंगा दाखवला आहे. हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच संजय राऊतांनी पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. (Bheema Sahakari Sugar Factory) मध्येही गैरव्यवहार होत असल्याचा दावा केला आहे. एवढंच नव्हे तर हा घोटाळा ५०० कोटींचा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचाही तपास भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांनी करावा अशी विनंती संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सहकार आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकर समितीचेही अध्यक्ष आहेत. या समितीने संजय राऊतांना आतापर्यंत नोटीस बजावली आहे.

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने शनिवारी छापेमारी केली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना समन्स बजावलं. यावरूनच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आता अॅक्शन मोडवर आले आहेत. आपणही एका साखर कारखान्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी कालच ट्वीटद्वारे केला होता. त्यानुसार, आज त्यांनी तपशीलासहित  भीमा सहकारी साखर कारखाना लि.मधील भ्रष्टाचारा उघडकीस आणला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊत भ्रष्ट कारखान्याची तक्रार फडणवीसांकडे पाठवणार, हसन मुश्रीफांचा फोटो ट्वीट करत म्हणाले…

संजय राऊत म्हणतात की, आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे व त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे, या मताचा मी आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार – गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग’ आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.

- Advertisement -

भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही संजय राऊतांनी केली. यावेळी त्यांनी या भ्रष्टाचारातील तपशीलही मुद्देसुद मांडला आहे.

संजय राऊतांनी विधिमंडळाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याकरता विशेषाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. विशेष म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. त्यामुळे संजय राऊतांचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -