नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात वर्षभर चाललेले युद्ध थांबवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रयत्नाचे नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धाबाबत समज दिली, ते कौतुकास्पद असल्याचे मत नोबेल समितीचे उपनेते आस्ले तोजे यांनी व्यक्त केले.
मोदींनी कोणतीही धमकी न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल कठोर संदेश दिला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज आहे, असेही तोजे म्हणाले. त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन याना ‘हे युद्धाचे युग नाही’ असे सांगितल्याबद्दल तोजे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. त्यामुळे मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात. ते अत्यंत विश्वासू नेते आहेत आणि ते शांतता प्रस्थापित करू शकतात. ते जगातील मोठ्या राजकारण्यांपैकी एक असून ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत.
India’s intervention to remind Russia of the consequences of using Nuclear weapons was very helpful. India didn’t speak in a loud voice, didn’t threaten anybody, they just made their position known in a friendly manner. We need more of that in International politics: Asle Toje,… https://t.co/mXndgFKdhY pic.twitter.com/fa6asPVmud
— ANI (@ANI) March 16, 2023
भारत महासत्ता बनणार
भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान मोदींच्या योगदानाचे तोजे यांनी कौतुक केले आहे. भारताला शांततेचा वारसा लाभला असल्यामुळे भारत एकदिवस महासत्ता बनणार आहे. मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर ते जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही काम करत याचा मला आनंद आहे, असेही तोजे म्हणाले.
हेही वाचा – पंतप्रधानांच्या स्वागत यात्रेला गुंडाची हजेरी, पीएमओ कार्यालय नाराज
असल तोजेबद्दल माहिती
असल तोजे हे नॉर्वेजियन नोबेल समितीचे डेप्युटी लीडर असून ते परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आहेत. त्यांनी 2009 पासून नोबेल शांतता पुरस्कार समितीमध्ये सामील होईपर्यंत नॉर्वेजियन नोबेल संस्थेत संशोधन संचालक म्हणून काम केले आहे. तोजे हे नॉर्वेजियन परराष्ट्र धोरणाच्या चर्चेत नियमित योगदान देतात. ते डॅगन्स नॅरिंगस्लिव्ह, मिनर्व्हामध्ये नियमित स्तंभलेखक आहेत. नॉर्वेजियन परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत ते लोकशाही, मार्केट इकॉनॉमी, कायद्याचे राज्य आणि जुन्या विचारांचे समर्थक आहेत. अलीकडेच तोजे यांनी आण्विक निःशस्त्रीकरण, शांतता आणि जिओपॉलिटिक्स या विषयांना आपला बहुतेक वेळ दिला आहे.