घरमहाराष्ट्रअमृता फडणवीस प्रकरणात फरार आरोपी जयसिंघानीचा २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश

अमृता फडणवीस प्रकरणात फरार आरोपी जयसिंघानीचा २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश

Subscribe

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिंघानी याने २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याचा फोटो समोर आल्याने अमृता फडणवीस यांच्या प्रकरणाला वेगळं वळण आले आहे.

अमृता फडणवीस यांच्या लाच प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्य्या अनिक्षा जयसिंघानीचे वडील, कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याने २०१४ साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला होता. खुद्ध उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचा फोटो आता समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अमृता – चतुर्वेदी यांच्या ट्विटर वार
ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरमध्ये म्हटले होती की, “गुन्हेगाराची मुलगी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी संपर्क साधते, त्यांची मैत्री पाच वर्षे टिकते. ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला महागडे दागिने आणि कपडे देते आणि गाडीत त्यांच्यासोबत फिरते. ती डिझायनर सट्टेबाजांबद्दल तक्रार करून पैसे कसे कमावता येतील हेदेखील सांगते. इतकं होऊनही मैत्री कायम राहते. आता ब्लॅकमेलिंगचे आरोप होत आहेत. महाराष्ट्रात हे काय चाललंय? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्राचे पोलीस त्यांना रिपोर्ट करतात आणि या प्रकरणात फिर्यादी स्वत: फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आहेत. त्यामुळे या प्रकरणाची विशेष चौकशी केली जायला हवी, अशी माझी मागणी आहे. हेच जर विरोधी पक्षातील कोणासोबत घडले असते तर उपमुख्यमंत्र्यांनी यावर नक्कीच मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे आरोप लावायला सुरू केली असती आणि ईडी, सीबीआय, एसआयटीतर्फे चौकशीचे आदेशही दिले असते.

- Advertisement -

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्य़ुत्तर देताना म्हटले की, “मॅडम चतुर – आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी अॅक्सिस बँकेला फायदा करून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात. अर्थात तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी पैश्यांची लाच देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याकडे संपर्क साधला असता, तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती, तीच तुमची औकात आहे. मला माहीत आहे की, तुमची औकात म्हणजे मास्टर्स बदलून प्रामाणिक आणि स्वतंत्र महिलांना खाली खेचणे. मिस चतुर, तुम्हाला स्वतंत्र तपासासाठी नाक खुपसण्याची काय गरज होती का? मी स्वतः याची मागणी करत आहे. जेणेकरून या फसवणुकीमागील खऱ्या चेहऱ्यांसह सत्य उजेडात येईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -