घरमहाराष्ट्रशिवधनुष्य एकाला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपेल का ते माहीत नाही; राज ठाकरेंचा...

शिवधनुष्य एकाला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपेल का ते माहीत नाही; राज ठाकरेंचा उद्धव, एकनाथ शिंदेंना टोला

Subscribe

मुंबईः शिवसेनेचा धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे फक्त बाळासाहेबांना पेलवणारं होतं. अजून दुसऱ्या कोणाला ते झेपणार नाही हे मला माहित होतं. एकाला झेपलं नाही. दुसऱ्याला झेपेल की नाही माहित नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाणला.

भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा झालेला खेळ पाहत आलो. पण हे सगळ राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होत. पण ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझ का माझं माझं का तुझ हे चालू होत तेव्हा मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडली कारण माझा वाद विठ्ठलासोबत नव्हता तर त्यांच्या सोबतच्या बडव्यांसोबत होता. म्हणून शिवसेना सोडली. कारण मला माहित होतं ही चार टकली शिवसेना फोडणार आहेत. मला त्यांचा भागीदार व्हायचे नव्हते. म्हणून शिवसेना सोडली, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचे बुधवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी दाखल झाले आहेत. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत लागू केली आहे. मुंबईचा कायापालट करण्यासाठी विविध योजना जाहिर करण्यात आल्या आहेत. असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे यातील कोणत्या मुद्द्यावरुन राज ठाकरे हे सरकारला घेरतील याची चर्चा सुरु होती.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -