घरताज्या घडामोडी'त्या' प्रकरणी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे व संजय राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे...

‘त्या’ प्रकरणी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे व संजय राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात न्यायालयाने खासदार संजय राऊत, ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात न्यायालयाने खासदार संजय राऊत, ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयानो दिले आहे. दरम्यान, याप्रकरणाची पुढची सुनावणी 17 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात पार पडणार आहे. (Delhi High Court Summons Uddhav Aditya Thackeray Sanjay Raut In Defamation Case File By Shiv Sena)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

“शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. ज्या-ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्या-त्या आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

- Advertisement -

याच मानहानी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज याचिका दाखल करुन घेतली आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. तसेच, न्यायालयात तिघांनाही याप्रकरणी स्वतः वैयक्तिकरित्या कोर्टात हजर राहून या आरोपांसंदर्भात स्वतःची बाजू मांडावी, अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, सोशल मीडियावर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासंदर्भात केलेली वक्तव्य अजुनही आहेत. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधात नोटीस काढली आहे. तसेच, त्यांना विचारणा करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्यापही या तिघांनी आमदार, खासदारांबाबत केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पोस्ट आहेत, त्या हटवण्यात का आलेल्या नाहीत, यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आहे.


हेही वाचा – मी अपशब्द वापरला असेन तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन – संजय शिरसाट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -