घरमहाराष्ट्रनाशिककर्णबधीर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होणार 'बेरा' यंत्र; प्रमाणपत्रासाठी बनाव करणाऱ्यांना बसणार...

कर्णबधीर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होणार ‘बेरा’ यंत्र; प्रमाणपत्रासाठी बनाव करणाऱ्यांना बसणार चाप

Subscribe

नाशिक : कर्णबधीरपणाचे कारण देत दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवून लाभ घेणार्‍यांना चाप बसणार आहे. कारण जिल्हा रुग्णालयात लवकरच बेरा (ब्रेनस्टेम इव्होक रिस्पॉन्स ऑडिमेट्री) यंत्र बसविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग निधीमधून हे यंत्र खरेदी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत निविदाप्रक्रीयेत असलेले हे यंत्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याची खरेदी होऊन जिल्हा शासकिय रुग्णालयात ते बसविण्यात येणार आहे.

दरम्यान, कर्णबधिर व्यक्ती आहे किंवा नाही या संदर्भातली तपासणी करण्यासाठी श्रवण तपासणी केली जाते. त्यालाच ऑडिओ मेट्री असे म्हणतात. हे करण्यासाठी एक आवाजबंद खोलीत श्रवनयंत्राद्वारे संबंधित व्यक्तीच्या कानाला ऑडिओमीटरचे हेडफोन लावून वेगवेगळ्या प्रकारचे तीव्रता आणि वारंवारता नुसार आवाज ऐकवले जातात. त्यानंतर त्या व्यक्तीचा प्रतिसाद नोंदविला जातो, हा प्रतिसाद श्रवण आलेखावर नोंदवला जातो. आणि मग श्रवणा आलेख काढला जातो. या, श्रवणाआलेखावरून संबंधित कर्णबधिर व्यक्तीच्या कानाची ऐकण्याची क्षमता किती आहे. त्यानुसार जर 40 टक्के कर्णबधिरत्वाचे प्रमाण असेल तर त्या व्यक्तीला श्रवण आलेखावरून अपंग प्रमाणपत्र देण्याची शिफारस करण्यात येते. त्याच बरोबर याच श्रवणआलेखावरून ऐकण्यासाठी श्रवण यंत्राची शिफारस केली जाते.

- Advertisement -

लहान मुलांच्या बाबतीत दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता तपासण्यासाठी देखील बेरा टेस्ट केली जाते. बेरा टेस्ट केल्यानंतर उजवा आणि डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता किती आहे हे श्रवण आलेखाद्वारे समजते, श्रवण आलेखावरून कर्णबधिर व्यक्तींचं अपंगत्व किती आहे हे ठरवले जाते. त्याचबरोबर श्रवण यंत्र देण्याची शिफारस केली जाते. श्रवणयंत्रमध्ये देखील वेगवेगळे प्रकार पडतात. तर योग्य श्रवण यंत्र कोणती द्यावी याबाबतची देखील माहिती बेरा टेस्ट केल्यानंतर समजते.
लवकरच जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -