घरदेश-विदेश'मारुती'ची उडी! आणखी एक रेकॉर्ड; भारतातच नव्हे तर विदेशातही क्रेझ

‘मारुती’ची उडी! आणखी एक रेकॉर्ड; भारतातच नव्हे तर विदेशातही क्रेझ

Subscribe

जपानची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

मारुती उडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आपसूक हनुमान उडी आठवेल. एखाद्याने एकमद धाडसाचं काम केलं की आपण त्याला ‘हनुमान उडी’ मारली असं म्हणतो. पण हेच आता भारतातली सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या बाबतीत म्हणावं लागेल. कार विक्रीसाठी मारुतीने अशीच ‘मारुती उडी’ घेतली आहे. कंपनीने विदेशात तब्बल २५ लाख वाहने एक्सपोर्ट करण्याचा आकडा पार केला आहे.

जपानची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्यावतीने एक निवेदन सादर करण्यात आलं आहे. ८० च्या दशकापासून वाहनांची निर्यात करणाऱ्या कंपनीने २५ लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे. हा स्वतःच एक विक्रम आहे आणि येणाऱ्या काळात कंपनी लोकांना उत्तम तंत्रज्ञानाची वाहने देण्यासाठी काम करत राहील.”, असं या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे मारुती कंपनीला फक्त भारतातूनच नव्हे तर विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

- Advertisement -

१९८६-८७ मध्ये बांगलादेश आणि नेपाळ सारख्या शेजारच्या बाजारपेठांमध्ये निर्यात सुरू करणाऱ्या कंपनीने सांगितले की, सध्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांसह सुमारे १०० देशांमध्ये ही कंपनी वाहने निर्यात करते. कंपनीच्या एकूण २५ लाखांच्या निर्यातीमध्ये मारुती सुझुकी बलेनो ही कार लॅण्डमार्क ठरली आहे. ही कार गुजरातमधील मुंद्रा बंदरातून लॅटिन अमेरिकेत पाठवण्यात आले आहे, असे कंपनीने या निवेदनात म्हटलं आहे.

हे ही वाचा: राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले; गिरीश बापट यांना विखे पाटलांची श्रद्धांजली

- Advertisement -

मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेऊची म्हणाले की, “२५ लाख वाहनांची निर्यात हे भारताच्या उत्पादन क्षमतेचे वैशिष्ट्य आहे. हे यश भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया उपक्रमाप्रती मारुती सुझुकीची वचनबद्धता दर्शवते. आज मारुती सुझुकी ही भारतातील प्रवासी वाहनांची सर्वात मोठी निर्यातदार आहे.”

हे ही वाचा: भडकाऊ भाषणावरून सुप्रीम कोर्टाचे शिंदे-फडणवीस सरकारला आदेश, वाचा सविस्तर…

गेल्या वर्षी इतकी वाहने निर्यात झाली
भारतात मारुतीच्या वाहनांची क्रेझ आहे. त्याचप्रमाणे सीमेपलीकडील अनेक देशांमध्ये मारुतीची मागणी सातत्याने वाढत आहे. मारुती सुझुकी इंडियाने मंगळवारी २०२२ मध्ये निर्यात होणाऱ्या वाहनांचा विक्री अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात मारुतीने २०२२ मध्ये निर्यातीत २८ टक्के वाढ नोंदवली आहे. २०२२ मध्ये मारुतीने एकूण २,६३,०६ वाहनांची निर्यात करण्यात यश मिळवले आहे.

एका वर्षात मारुतीने आपली एवढी वाहने इतर देशांमध्ये निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीचा रेकॉर्ड २,०५,४५० वाहनांचा आहे, ज्यांची विक्री २०२१ मध्ये झाली होती. पुढील वर्षांमध्ये अधिक वाहने निर्यात करण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -