घरमहाराष्ट्रमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; धरणांमधील पाणीसाठा घटला, ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी लागणार?

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; धरणांमधील पाणीसाठा घटला, ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी लागणार?

Subscribe

Water Storage in Dam | अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्ये वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या सात धरणांमधून मुंबईकरांना पाणीपुरवठा होत असतो. या धरणांमध्ये मुंबईताला ३८०० दशलक्ष लिटर प्रति दिवस पाणीपुरवठा केला जातो.

Water Storage in Dam | मुंबई – जलबोगद्याच्या कामामुळे मुंबईत १५ दिवस पाणी कपात (Water Shortage in Mumbai) सुरू असतानाच मुंबईकरांसाठी आणखी एक बातमी समोर येतेय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ ३७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मुंबईवर पुन्हा एकदा पाणी कपातीची टांगती तलवार आहे. पावसाळा उशिराने सुरू झाल्यास मुंबईवर पाणी कपातीचं संकट ओढावू शकतं. त्यामुळे, आतापासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाणी कपातीचे संकट; ठाणेकरांना 30 दिवस करावे लागणार नियोजन

- Advertisement -

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्ये वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या सात धरणांमधून मुंबईकरांना पाणीपुरवठा होत असतो. या धरणांमध्ये मुंबईताला ३८०० दशलक्ष लिटर प्रति दिवस पाणीपुरवठा केला जातो. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या सातही धरणांची एकूण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. परंतु, या धरणांमध्ये सध्या ५ लाख ४५ हजार १९८ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसानुसार मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल अशा पद्धतीचं नियोजन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केली होती. मधल्या काळातही पुरेसा पाऊस पडल्याने धरणांमध्ये मुबलकप्रमाणात पाणीसाठा तयार झाला होता. ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुंबईतील धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे मुंबईकरांसाठी वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली होती. परंतु, एप्रिल महिन्याला सुरुवात होण्याआधीच धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने ऐन मे महिन्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण होऊ नये म्हणून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

३० एप्रिलपर्यंत पाणीकपात

मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जल बोगद्याच्या ठाणे येथील कुपनलिकेच्या खोदकामामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मुंबई आणि ठाण्यात ३० एप्रिलपर्यंत १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -