घरमहाराष्ट्रतुमचा डेटा शाबूत आहे... एमपीएससीने ट्वीट करून केला खुलासा

तुमचा डेटा शाबूत आहे… एमपीएससीने ट्वीट करून केला खुलासा

Subscribe

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्व परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या हॉल तिकिटची फक्त लिंक शेअर केली आहे. उमेदवारांचा डेटा शाबूत आहे, असं ट्वीट एमपीएससीने केलं आहे. त्यामुळे उमेदवरांचा डेटा लिक झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पुढच्या रविवारी म्हणजे ३० एप्रिलला एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे हॉल तिकिट आयोगाने टेलिग्रामवर शेअर केलं. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला. आधारकार्डसह अन्य माहिती लिक झाल्याचा दावा करण्यात आला. अखेर आयोगाने खुलाश्याचे प्रसिद्धी पत्रक ट्वीट केले. या ट्विटमुळे उमेदवारांचा जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

MPSCच्या पूर्वपरीक्षेचे हॉल तिकिटे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती रविवारी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. टेलिग्राम अॅपवर लाखो उमेदवरांची संवेदनशील माहिती आणि त्यांच्या हॉल तिकिटचा डेटा लिक झाल्याची माहिती देण्यात आली. तब्बल एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लीक झाली असून प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. टेलिग्राम चॅनलवर १ लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा असून आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर करण्यात आला. या माहितीमध्ये ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रं, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आणि अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, असा दावा या चॅनलवर करण्यात आला होता.

- Advertisement -

या सर्व गोंधळाची आयोगाने दखल घेतली. उमेदवारांची कोणतीही खासगी माहिती लिक झालेली नाही. केवळ हॉल तिकिट टेलिग्रामवर आहे, असे ट्वीट आयोगाने केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -