घरमहाराष्ट्रकाय होईल ते बघू...; मुख्यमंत्री बदलावर अजित पवार स्पष्टच बोलले

काय होईल ते बघू…; मुख्यमंत्री बदलावर अजित पवार स्पष्टच बोलले

Subscribe

 

पुणेः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय अजून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. न्यायालयाचा निर्णय आल्यावर बघू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलावर दिली.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकतो आहे. जेव्हा होईल तेव्हा बदल होईल. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजून आलेला नाही. निर्णय आल्यावर काय होईल ते बघू.

काकांकडे लक्ष द्या, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला. यावरून अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. राज ठाकरे यांनी काकाकडे जसं लक्ष ठेवलं तसंच लक्ष मीही माझ्या काकांवर ठेवतो, असा खोचक टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सध्या रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या सर्वांचे खंदे समर्थक त्यांच्या नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य दावेदार असल्याचे वक्तव्य केले. त्यावर जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदासाठी माझ्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

तव्यावरची भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी एका कार्यक्रमात केले. पक्षात नवीन चेहरे आले पाहिजे. तरुणांना संघी मिळाली पाहिजे, या हेतून पवार साहेब बोलले असतील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी करायची ते ठरवलं पाहिजे. वरच्या टप्प्यात कोणा कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्यावतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवं नेतृत्व तयार केलं जाईल. आता विलंब करुन चालणार नाही. भाकरी फिरवण्याची वेळ आली. भाकरी फिरवली नाही तर ती करपते असे वक्तव्य शरद पवार यांनी बुधवारी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -