घरदेश-विदेशसट्टेबाजीसंबंधित जाहिरातींवर होणार कारवाई; केंद्राकडून राज्यांना निर्देश

सट्टेबाजीसंबंधित जाहिरातींवर होणार कारवाई; केंद्राकडून राज्यांना निर्देश

Subscribe

नवी दिल्ली : सट्टेबाजी संबंधित जाहिरातींचा प्रचार (Promotion of betting related advertisements) गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या सट्टेबाजीमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे केंद्राकडून राज्यांना संबंधित जाहिरातींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

भारतात सट्टेबाजी बेकायदेशीर आहे, पण असे असतानाही मोठ्या प्रमाणावर खुलेआम सट्टेबाजी संबंधित जाहिराती देशभरात होर्डिंग्ज आणि ऑटो-रिक्षांवर दिसायला सुरूवात झाली आहे. क्रिकेटवर, मनोरंजन क्षेत्रातील मोठे व्यक्ती या जाहिरातींचा प्रचार करताना दिसतात. त्यामुळे त्यामुळे माहिती आणि प्रसारण सचिव (Information and Broadcasting Secretary) अपूर्व चंद्रा (apurva chandra) यांनी मंगळवरी (2 मे) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून जुगार आणि सट्टेबाजी संबंधित होर्डिंग्ज, बॅनर आणि ऑटो-रिक्षांवर दिसणार्‍या जाहिरातींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

अपूर्व चंद्रा म्हणाले की, ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिराती नागरिकांची दिशाभूल करत आहेत. या जाहिराती ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन ऍक्ट, 1995 अंतर्गत जाहिरातींच्या संहिता आणि 1978 अंतर्गत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करतात. भारतातील बहुतांश भागांमध्ये सट्टेबाजी आणि जुगार बेकायदेशीर आहे. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचा प्रचार होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचे आणि विशेषत: तरुण आणि तरुणींसाठी सामाजिक आर्थिक धोके निर्माण करतात, असेही चंद्रा म्हणाल्या.

सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या बाहेरील जाहिरातींना आळा बसणार
सट्टेबाजी आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त या जाहिराती प्रसारमाध्यमांच्या प्रिंट, डिजिटल आणि टेलिव्हिजन या विभागात दिसू लागल्या आहेत. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खाजगी दूरचित्रवाणी चॅनेल, डिजिटल वृत्त प्रकाशक आणि OTT प्लॅटफॉर्मला अशा जाहिराती प्रकाशित आणि प्रसारित करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सल्लागार जारी केला आहे. या समितीने निर्देश दिले की, सट्टेबाजी आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेरील जाहिरातींना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई केली करावी.

- Advertisement -

मंत्रालयाकडून यापूर्वीही निर्देश दिले होते
मंत्रालयाने यापूर्वी 13 जून 2022 रोजी प्रसारमाध्यमांनासाठी एक निवेदन जारी केले होते, त्यात म्हटले होते की, सार्वजनिक हितासाठी अशा जाहिराती प्रकाशित करून नये. त्यानंतर ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराच्या जाहिरातींच्या प्रथेला आळा घालण्यासाठी मंत्रालयाने 3 ऑक्टोबर 2022 रोजी खाजगी उपग्रह दूरचित्रवाणी चॅनेल, डिजिटल बातम्या प्रकाशक आणि ओटीटी (Over-the-top or streaming) प्लॅटफॉर्मला दोन सूचना जारी केल्या होत्या. अशा प्लॅटफॉर्म किंवा त्यांच्या कोणत्याही संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींचे प्रसारण किंवा प्रकाशन करण्यापासून परावृत्त केले होते. या निर्णयावर पुन्हा 6 एप्रिल 2023 रोजी पुनरुच्चार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -