घरताज्या घडामोडी४० आमदारांसह वजीर गायब होणारा होता पण... शिंदे गटातील आमदाराची राष्ट्रवादीवर टीका

४० आमदारांसह वजीर गायब होणारा होता पण… शिंदे गटातील आमदाराची राष्ट्रवादीवर टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेते मंडळींना धक्का बसला आहे. शरद पवारांच्या घोषणेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता. पण शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या, असं महेश शिंदे म्हणाले.

महेश शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हुशार आहेत. वजीर निघून चाललाय हे पवारांना कळलं होतं. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. थोड्या दिवसांनी हे होणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न नाही पण शरद पवारांना हा पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या आहेत, असं महेश शिंदे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका घरात दोन मुख्यमंत्री कसे होणार?, हा मोठा प्रश्न आहे. ज्याची क्षमता आहे. त्याने मुख्यमंत्री होण्यास काहीच हरकत नाही, असं महेश शिंदे म्हणाले.

शरद पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार?, हा प्रश्न विचारल्यानतंर शिंदे म्हणाले की, ज्या जमिनीवर उभा होतो, ती जमीनच विकली गेली आहे. हे आता त्यांना कळलं आहे. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे, असंही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : BREAKING : NCP अध्यक्षपदात रस नाही, अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -