घरताज्या घडामोडी'मिठी नदीतील गाळ काढण्यात त्रुटी आढळल्या तर...', मुख्यमंत्री शिंदेंचे पालिका आयुक्तांना खडेबोल

‘मिठी नदीतील गाळ काढण्यात त्रुटी आढळल्या तर…’, मुख्यमंत्री शिंदेंचे पालिका आयुक्तांना खडेबोल

Subscribe

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होते. तसेच, सर्वसामान्यांनाही त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांचीसफाई केली जाते. मात्र नाल्यांच्या सफाईनंतरही मुंबईत गुडघाभर पाणी साचते.

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होते. तसेच, सर्वसामान्यांनाही त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांचीसफाई केली जाते. मात्र नाल्यांच्या सफाईनंतरही मुंबईत गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेकडून नाल्यांची सफाई सुरू करण्यत आली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मिठी नदीपासून पावसाळीपूर्व कामांच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी त्यांनी मिठीनदीतील गाळ कितीप्रमाणात काढण्यात आला याची तपासणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयक्तांना खडेबोल सुनावल्याची माहिती समोर येत आहे. (Mithi River Mumbai BMC Commissioner Iqbal Singh chahal cm eknath Shinde rain water logging)

- Advertisement -

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“किती मेट्रीक टन गाळ काढण्यात आला. यापेक्षा आपल्या मशीन किती खोल खाली गेल्या हे महत्त्वाचे आहे. नदीतील खडकापर्यंत आपली मशीन पोहचेल तसेच, पूर्ण गाळ जेव्हा निघेल तेव्हाच पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून नगरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे आम्ही पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मिठी नदी महत्त्वाची आहे. त्यामुळे गाळ तळापर्यंत काढल्यावरच दिलासा मिळेल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

“मिठी नदीतील गाळ काढण्यात काही त्रुटी राहिल्या, गाळ काढला नाही आणि पाणी साचलं तर, सबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशाही सुचना केल्या आहेत”, अशा शब्दांत खडेबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सुनावले.

दरम्यान, वरळी येथील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या ठिकाणी नाल्यांना फ्लड गेट लावण्यात आले आहेत. जेणे करून भरतीच्यावेळी समुद्रातील पाणी नाल्यांमध्ये शिरणार नाही.

अशाचप्रकारे फ्लड गेट आणि वेगाने पावसाचे पाणी समुद्रात फेकणाऱ्या पंपाची संख्या वाढवावी असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे हद्दीतील नाल्यांची देखील चांगल्या पद्धतीने सफाई झाली पाहिजे जेणे करून रेल्वेरुळांवर पाणी साचणार नाही. याची देखील दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले.

दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वांद्रे (पूर्व) परिसरातील मिठी नदी येथून पाहणी दौऱ्यास सुरूवात केली. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील भारत नगर येथे वाकोला नदीची पाहणी केली. त्या पाठोपाठ दादर मधील प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीचे बांधकाम, वरळीतील लव्हग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी भेट देवून नालेसफाई तसेच पावसाळ्यात पाणी साचणार यासाठीच्या कामांचा आढावा घेतला.


हेही वाचा – Bailgada Sharyat: हा विजय सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -