घरताज्या घडामोडीराज्यात उन्हाच्या तडाख्यात अवकाळी पावसाची हजेरी, अतिवृष्टीमुळे घरांचं मोठं नुकसान

राज्यात उन्हाच्या तडाख्यात अवकाळी पावसाची हजेरी, अतिवृष्टीमुळे घरांचं मोठं नुकसान

Subscribe

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असला तरी ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागांत अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर इथे तुफान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ३५ हून अधिक आदिवासी कुटुंबांतील घरांचे नुकसान झाले आहे.

घरावरील पत्रे आणि छपदेखील उडून गेले आहेत. घरात साठवून ठेवलेले धान्य आणि इतर संसार उपयोगी वस्तूही पूर्णपणे पाण्यात भिजल्या असून मोठं नुकसान झालं आहे. रापापुर परिसरात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना देखील पूर आला आहे. तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडंही कोलमडून पडली आहे.

- Advertisement -

उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्याने आदिवासी हताश झाले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे घरांचे आणि विजेच्या खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब कोसळल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शासनाने याबाबत पंचनामे करून त्वरीत मदत करावी, अशी मागणी आता आदिवासी कुटुंबाकडून केली जात आहे.

8 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं होतं. 11 मे रोजी त्याचं सायक्लोनिक स्टॉर्म अर्थात मोखा चक्रीवादळात रुपांतर झालं. काही तासांतच त्याची तीव्रता सिव्हियर सायक्लोनिक स्टॉर्म पर्यंत वाढली. मुळात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान विशिष्ट प्रमाणात वाढलं की, पाण्याची वाफ होऊन ती वर सरकू लागते, तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होते.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्र आणि बाडेन-वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार – दीपक केसरकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -