घरताज्या घडामोडीक्रिकेटच्या सट्ट्याने घेतला आई-मुलाचा जीव; वाचा नेमकं प्रकरण काय?

क्रिकेटच्या सट्ट्याने घेतला आई-मुलाचा जीव; वाचा नेमकं प्रकरण काय?

Subscribe

क्रिकेटच्या सट्ट्यामुळे आई-मुलाने जीव गमवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली. खितेन वाघवानी (20) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून, दिव्या नरेश वाघवानी असे मुलाच्या आईचे नाव आहे. ४८ तासातच वाघवानी कुटुंबातील 20 वर्षीय हितेनने आत्महत्या केली. त्यानंतर त्याची आई दिव्या वाघवानी यांनी आत्महत्या केली.

क्रिकेटच्या सट्ट्यामुळे आई-मुलाने जीव गमवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली. खितेन वाघवानी (20) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून, दिव्या नरेश वाघवानी असे मुलाच्या आईचे नाव आहे. ४८ तासातच वाघवानी कुटुंबातील 20 वर्षीय हितेनने आत्महत्या केली. त्यानंतर त्याची आई दिव्या वाघवानी यांनी आत्महत्या केली. नागपूर शहरातील छापरू नगर परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर वाघवानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (in nagpur youth commits suicide after losing money in cricket betting mother also dies due to shock)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत खितेन नरेश वाघवानी याला सट्टा खेळण्याची सवय होती. खितेन दररोज सट्टा खेळायचा. शनिवारी खितेन मध्यरात्री उशिरा घरी पोहोचला. त्यावेळी त्याच्या आईने रागात त्याला फटकारले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब शहरातील आशीर्वाद नगर येथे नातेवाईकाच्या ठिकाणी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. दरम्यान, खितेंनी घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. परिवार घरी परतल्यावर त्यांनी खितेन फासावर लटकलेला आढळला. घडल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत आंबेडकर चौकाजवळील छापरू नगर संकुलात वाघवानी कुटुंब राहतात. मृत २० वर्षीय खितेन नरेश वाघवानी हा घरी परतला होता, असे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास घरी उशिरा आल्याबद्दल खितेनच्या आईने त्याला फटकारले. याप्रकारणी खितेनचे वडील आणि बहिणीला मोठ्ठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लकडगंज पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, मुलाच्या मृत्यूला 48 तास उलटत नाही तोवर त्याची आई दिव्या नरेश वाघवानी यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर आई दिव्याची तब्येत अचानक बिघडली आणि तिची प्रकृती बिघडली, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यावेळी दिव्या वाघवानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारावेळी दिव्या यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आईला आपल्या मुलाला शिव्या दिल्याचा पश्चाताप होत होता, तिच्या शिव्यामुळेच मुलाने आत्महत्या केली असे तिला वाटले असावे.

- Advertisement -

हेही वाचा –‘आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची चौकशी, सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर’; पवारांचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -