घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलीस दलात मोठे फेरबदल; बदल्या, बढत्यांना मुहूर्त, कोण आले कोण गेले?

पोलीस दलात मोठे फेरबदल; बदल्या, बढत्यांना मुहूर्त, कोण आले कोण गेले?

Subscribe

नाशिक : राज्यातील पोलीस निरीक्षकांची पदोन्नतेची प्रतीक्षा संपली असून, रखडलेल्या बढत्या आणि बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्य शासनाने सोमवारी रात्री पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करत राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यात नाशिक आयुक्तालयातील आठ, नाशिक ग्रामीण पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतील (एमपीए) प्रत्येकी दोन पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. नाशिक आयुक्तालयात चंद्रपूर, बृहन्मुंबई आणि चिपळूण येथून नवे पोलीस अधिकारी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्तालयातील कार्यपद्धतीत फेरबदल होणार आहे.

नाशिक शहरातील सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची नाशिक शहर आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्तपदी पदस्थापना झाली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना श्रीरामपूर, भद्रकालीचे दत्ता पवार यांना शहादा, सरकारवाड्याचे साजन सोनवणे यांना अक्कलकुवा, विशेष शाखेचे संजय बांबळे यांना धाराशिव, दहशतवादी विरोधी पथकाचे हेमंत सोमवंशी यांना गुन्हे अन्वेषण विभागात अपर पोलीस अधीक्षक, प्रभाकर घाडगे यांना ठाण्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत उपअधीक्षक पदावर बढती मिळाली आहे.

- Advertisement -

राज्य पोलीस दलात विविध विभागात दोनशेपेक्षा जास्त सहायक पोलीस आयुक्त तथा उपअधीक्षकांची पदे रिक्त असल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये १७५ निरीक्षकांची बढती करण्याचा निर्णय झाला. या पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असल्याने संबंधित पोलीस अधिकार्‍यांना नियमाधीनतेचा आणि सेवाज्येष्ठतेचा हक्क नसेल, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.नाशिक ग्रामीणचे निरीक्षक बापू रोहोम यांची नागपूर ग्रामीणच्या काटोलमध्ये आणि वसंत भोये यांची नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील मनोहर दाभाडे यांची अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये, किरण साळवी यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीतच उपअधीक्षक, नाशिक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे देवराम गवळी यांची मलकापूर, बाबासाहेब ठोंबे यांची नाशिक गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. नाशिक शहर आयुक्तालयातील विशेष शाखा आणि युनिट तीनच्या सहायक पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नाशिक शहरासह ग्रामीणमध्ये उल्लेखनीय जबाबदारी सांभाळलेल्या सोमनाथ तांबे यांची आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये बदली झालेले अधिकारी

  • सोमनात तांबे : निफाड येथून नाशिक शहर
  • शेखर देशमुख : आर्थिक गुन्हे चंद्रपूर येथून नाशिक शहर
  • नितीन जाधव : बृहन्मुंबई येथून नाशिक शहर 
  • सचिन बारी : चिपळूण उपविभाग येथून नाशिक शहर 
  • विक्रम कदम : पंढरपूर येथून कळवण (नाशिक ग्रामीण)
  • नीलेश पालवे : सहाय्यक आयुक्त नागपूर येथून निफाड (नाशिक ग्रामीण)
  • प्रदीप मैराळे : धुळे ग्रामीण येथिण महामार्ग सुरक्षा नाशिक 
  • सुनील भामरे : जात पडताळणी समिती अहमदनगर येथून नाशिक ग्रामीण 
  • संजय सांगळे : जात पडताळणी नंदुरबार येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक 

नाशिकमधून बदली झालेले अधिकारी

  • दीपाली खन्ना : नाशिक शहर येथून मीरा-भाईंदर, वसई-विरार 
  • सोहेल शेख : नाशिक शहर येथून मनमाड 
  • अर्जुन भोसले : नाशिक ग्रामीण येथून पंढरपूर
  • प्रदीप जाधव : मालेगाव छावणी येथून महाड, रायगड 
  • जॉर्ज फर्नांडिस : गुप्तचर प्रशिक्षण संस्था, नाशिक येथून बृहन्मुंबई
  •  संजय सावंत : महाराष्ट्र पोलीस अकादमी येथून रायगड मुख्यालय 
  • नरसिंग यादव : महाराष्ट्र पोलीस अकादमी येथून बृहन्मुंबई 
  • किशोर यादव : नागरी हक्क संरक्षण, नाशिक येथून आर्थिक गुन्हे, सिंधुदुर्ग 
  • नितीनकुमार पोंदकुले : जात पडताळणी समिती, नाशिक येथून माणगाव, रायगड 

नीलेश माईनकरांचा पदोन्नतीसह नियुक्तीचा मार्ग मोकळा

नाशिक शहर गुन्हे शाखा, इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यात जबाबदारी सांभाळेल्या वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आमदार सुहास कांदे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यावरुन गंगापूर पोलीस ठाण्यात माईनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. परिणामी, माईनकर यांना आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नेमण्यात आले. मात्र, गृह विभागाच्या आदेशान्वये माईनकर यांच्या पदोन्नतीसह नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालयात पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -