घरताज्या घडामोडी'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटच्या दिग्दर्शकाला पंजाब पोलिसांची नोटीस; नेमकं प्रकरण...

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटच्या दिग्दर्शकाला पंजाब पोलिसांची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा हिंदी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पण या ट्रेलर प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ हा हिंदी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पण या ट्रेलर प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रोहिंग्या संघटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. (Director of The Diary of West Bengal Sanoj Mishra summoned by Kolkata Police)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल पोलिसांनी ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे. या चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आहेत.

- Advertisement -

पश्चिम बंगाल पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमुळे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना मंगळवारी (30 मे) दुपारी 12 वाजता या प्रकरणाचे तपास अधिकारी सुभब्रत कार यांच्यासमोर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाबाबत पश्चिम बंगाल पोलिसांनी आयपीसीच्या कलम 120(B), 153A, 501, 504, 505, 295 A, आयटी अॅक्ट कलम 66 D, 84B आणि सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या कलम 7 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

- Advertisement -

कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, ‘एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आम्ही कायदेशीर लढाई लढू. ऑगस्ट 2023 मध्ये ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे’, असे सनोज कुमार मिश्रा यांचे वकील नागेश मिश्रा म्हणाले.


हेही वाचा – IIFA पुरस्कार मध्ये सलमानच्या बॉडीगार्डने दिला विक्की कौशलला धक्का; नेटकरी संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -