घरक्राइमअंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी बनवण्याचे काम सुरू; ५४ होणार...

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी बनवण्याचे काम सुरू; ५४ होणार तडीपार

Subscribe

नाशिक : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी ५४ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यातील काही प्रस्तावांना मान्यता मिळाली असून, काही प्रस्ताव लवकरच मान्यता मिळार आहे. नवीन नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी अंबड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

अंबड पोलिसांनी दीड महिन्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे व रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना तडीपार केले. २२ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठविले. तर १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम अंबड पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे एकूण ५४ गुन्हेगारांचे तडीपार प्रस्ताव केले असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली.

- Advertisement -

अंबड पोलीस ठाणेच्या हद्दीत सिडको , खुटवडनगर , उंटवाडी, कामटवाडे, डिजीपीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत परिसर आहे. अंबडगाव, अंबड औद्योगिक वसाहत, तसेच चुंचाळे साठी पोलिस ठाणे प्रमाणे काम चालणारे स्वतंत्र पोलिस चौकी निर्मिती केली आहे. सिडको व परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. यात दोनपेक्षा अधिक गुन्हे असणारे गुन्हेगार, सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे गुन्हेगार, तसेच पोलिस रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांची माहिती जमा करून त्यांच्यावर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, यासाठी पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विभाग स्थापन करून माहिती संकलीत जात आहे. अंबड पोलिसांनी दीड महिण्यात १२ गुन्हेगारांचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सदर प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. यानंतर अंबड पोलिसांनी १२ गुन्हेगारांना नाशिकच्या बाहेर इतर जिल्ह्यात रवाना केले आहे. या शिवाय बहुतांश गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलिस शिपाई राकेश पाटील, सुधीर आव्हाड, नितीन सानप, गणेश झनकर आदी काम करत आहेत. ४२ तडीपार प्रस्तावांमध्ये कोणाचे नाव आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -