घरमहाराष्ट्रपुणेभाजपाला 2024 मध्ये निवडून द्यायचं की नाही हे...; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य

भाजपाला 2024 मध्ये निवडून द्यायचं की नाही हे…; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य

Subscribe

पुणे : एका सर्वेनुसार 2024 लोकसभा निवडणुकी भाजपासाठी धोक्याची घंटा आहे आणि राहुल गांधीचा चेहरा चालणार आहे, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा सर्व्हे नाही हे वास्तव आहे. गेले सहा महिने आम्ही बोलूल बोलून थकलो कोणी ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे गेले सहा महिने आम्ही जे बोललो त्याला तुम्ही सर्व्हेचा नाव देत आहात. भाजपाला 2024 मध्ये निवडून द्यायचं की नाही हे भारतातली जनता ठरवेल. त्याच्यावर बोलणे अयोग्य ठरेल, असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी दिली. (Supriya Sule Indicative statement by Whether to elect BJP in 2024 or not…)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये विरोधकही असले पाहिजे आणि सत्तेतले लोकही असेल पाहिजेत. सगळ्यांचे समन्वय साधून हा देश चालतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये अनेक वेळा असे झालेले आहे की, इथले महत्त्वाचे मंत्री बिल पास करायची असतात तेव्हा त्यांनी या देशातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोन केलेले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्याच्या सोयीप्रमाणे विरोधी पक्ष त्यांना लागतो आणि सोयीप्रमाणे यासाठी लागतो कारण ते काही कामाचे नसतात हे दुर्देवी आहे आणि लोकशाहीसाठी घातक आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी सरकावर केला.

- Advertisement -

लोकशाहीचं सरकार राहिलेलेचं नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नव्या संसद भवन आणि स्वातंत्रवीर सावकर यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला आमंत्रण पाठवलं नाही याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. आम्हाला याची सवय आहे. कारण हे दडपशाहीचं सरकार आहे. लोकशाहीचं सरकार राहिलेलेचं नाही, असं त्याच्या वागण्यामधून दिसायला लागलेलं आहे.

दुसऱ्याच्या घरात बघायला मला फार वेळ नाही
भाजपा आणि शिंदे गटात अलबेल आहे की नाही, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुसऱ्याच्या घरात बघायला मला फार वेळ नाही. लोकसभेच्या तयारीला महाविकास आघाडी लागलेली आहे. त्यामुळे त्याच्या संसारात काय चालले ते त्यांनी बघावे. आम्हाला वेळ नाही. महागाई असेल केव्हा ज्या पद्धतीने आज नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे. अशी आव्हान असताना त्यांच्या घरात कशाला डोकवू आम्ही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -