घरक्राइममुंबईत लव्ह जिहादचा प्रकार! धर्म बदलून लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल

मुंबईत लव्ह जिहादचा प्रकार! धर्म बदलून लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल

Subscribe

मुंबईमध्ये राहणाऱ्या एका म़ॉडेलने तनवीर अख्तर नावाच्या एका मुस्लिम तरुणाने लव्ह जिहादचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून तनवीर आपल्याला ब्लॅकमेल करतोय धर्मांतर करुन लग्न करण्यासाठी दबाव टाकतोय, असा आरोप या मॉडेलकडून करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या एका म़ॉडेलने तनवीर अख्तर नावाच्या एका मुस्लिम तरुणाने लव्ह जिहादचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून तनवीर आपल्याला ब्लॅकमेल करतोय धर्मांतर करुन लग्न करण्यासाठी दबाव टाकतोय, असा आरोप या मॉडेलकडून करण्यात आला आहे. ( Mumbai bihar bhagalpur to Mumbai ranchi bihar femal model manvi raj singh inside story love Jihad )

ही मॉडेल मुळची बिहारला राहणारी आहे. 2020 पासून ही मॉडेल त्या व्यक्तीला ओळखते. तेव्हा या व्यक्तीने आपलं नाव यश असं सांगितलं. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिच्यासोबत काही आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्यानंतर आता तो तिला ब्लॅकमेल करत आहे. तसचं हा तरुण काही दिवसांपूर्वी तिच्यामागे रांचीला गेला आणि गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही या मॉडेलकडून करण्यात आला आहे. तसचं, धर्मपरिवर्तन करुन लग्न कर असा दबाव याआधीही त्याने अनेक मुलींवर टाकल्याचं या मॉडेलने म्हटलं आहे.

- Advertisement -

झारखंडची राजधानी रांची येथील यश मॉडेलिंग कंपनीच्या मालकावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप अन्य कोणी केलेला नसून येथे मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीने केला आहे. बिहारची रहिवासी असलेली मानवी राज झारखंडमधील रांची येथे आली होती जेणेकरून ती मॉडेलिंगमध्ये स्वत: ला तयार करू शकेल आणि एक उत्तम मॉडेल बनू शकेल.

तिने रांचीमधील एका ग्रूमिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेच्या मालकाने मानवीला पाहिले तेव्हा त्याला ती खूप आवडली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण संस्थेच्या मालकाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. मैत्रीचे हे नाते अजून वाढावे असे त्याला वाटत होते.

- Advertisement -

त्याला मानवीशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने मानवीला प्रपोज केलं. तेव्हाच मानवीला कळले की ती ज्याला मित्र मानत आहे ती व्यक्ती तिच्याशी खोटं बोलत आहे. वास्तविक, संस्थेच्या मालकाने त्याचे नाव यश असे सांगितले. त्याचं खरं नाव तनवीर अख्तर खान आहे. हा सर्व प्रकार तरुणीला कळल्यावर तिने त्याच्याशी असलेली मैत्री तोडली.

तनवीरला ही गोष्ट आवडली नाही. आता तो तिच्यावर लग्न करून धर्म बदलण्यासाठी अधिक दबाव टाकू लागला. पण मानवीने त्याचा आधीच तिरस्कार केला होता. त्यामुळेच तिने तनवीरचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर प्रकरण आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहोचले. तनवीर मानवीला ब्लॅकमेल करू लागला. वास्तविक, त्याच्याकडे मानवीचे काही वैयक्तिक फोटो होते. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांनी लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

याला कंटाळून मानवीने रांची शहर सोडले. ती मुंबईला शिफ्ट झाली. पण एकतर्फी प्रेमात वेडा झालेला तनवीर इथेही तिचा पाठलाग सोडला नाही. तो तिला धमक्या देत राहिला. नाराज झाल्यानंतर मानवीने वर्सोवा पोलिस ठाण्यात तनवीरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित मॉडेलने पोलिसांना सांगितले की, तिची रांचीमधील ग्रूमिंग इन्स्टिट्यूटचे मालक तनवीर खान याच्याशी मैत्री होती. पहिल्या भेटीत तनवीरने आपले नाव यश असे सांगितले. पण, नंतर तिला कळले की त्याचे खरे नाव यश नसून तनवीर आहे. वास्तविक, तरुण मॉडेल्सना ग्रूमिंग इन्स्टिट्यूटमध्ये मॉडेलिंगचे बारकावे शिकवले जातात. कसं दिसावं, कसं बोलावं. यासोबतच काही संस्था मॉडेलिंग असाइनमेंटही देतात.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, मैत्रीदरम्यान तनवीरने तिला होळीच्या दिवशी काही नशिले पदार्थ खाऊ घातल्यानंतर तिचे काही फोटो काढले. यानंतर तनवीरने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि भांडणाचा प्रकारही सुरू झाला. आरोपी तनवीरने तिच्यावर धर्म बदलून लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. वैतागून ती मुंबईत आली. मात्र त्यानंतरही तो तिला ब्लॅकमेल करत होता.

( हेही वाचा: वाहनचालकांकडून मनमानी दंड वसुलीबाबत मनसे आक्रमक; उद्या करणार आंदोलन )

तनवीरने चूक केली मान्य 

जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा तनवीरने आपली चूक मान्य केली आणि पीडितेला एफआयआर मागे घेण्यास सांगितले. तनवीर खानने कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कबूल केले की तो तिला त्रास देत होता. मात्र, तिला कोणत्याही प्रकारे इजा करण्याचा त्याचा हेतू नव्हता.

दोघांना एकत्र राहता यावे, यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी तो असं करायचा. याशिवाय भविष्यात असे काही करणार नाही, अशी कबुलीही त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात दिली आहे. पण त्यानंतरही तो असे प्रकार करत आहे.

पीडितेने तिच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ अपलोड करून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना संरक्षणाची विनंती केली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तपासाच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण मुंबईहून रांची येथे वर्ग करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

 सर्व आरोप चुकीचे – तनवीर

तनवीरने या संपूर्ण प्रकरणावर वेगळीच कहाणी सांगितली आहे. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, मानवी माझ्यासोबत काम करायची. दरम्यान, मानवीमुळे माझ्या व्यवसायाचे नुकसान झाले, त्यामुळे मी तिच्याकडे भरपाई मागितली. तेव्हापासून ती मला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. तिच्याकडे माझे काही खाजगी फोटोही आहेत, जे तिने माझ्या ओळखीच्या लोकांना पाठवले आहेत.

तनवीरने सांगितले की, मानवीचा प्रियकर रवज्योत सिंग आणि त्याचा मित्रही माझ्या मोबाईलमधील डेटा चोरून मला ब्लॅकमेल करायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -