घरमहाराष्ट्र'मी बेबाक बोलतो'; क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

‘मी बेबाक बोलतो’; क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

Subscribe

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर पोलिस स्थानकात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. यावर आता त्यांना पोलिसांकडून क्लिन चिट देण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर पोलिस स्थानकात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. यावर आता त्यांना पोलिसांकडून क्लिन चिट देण्यात आली आहे. ही क्लिन चिट मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( I speak boldly Sanjay Shirsat s reaction after getting a clean chit from Chhatrapati Smabhaji Nagar police Station  )

शिरसाट म्हणाले की, मी कोणाचेही नाव घेतलं नाही. तुम्ही कटाने केले. काही लोकांना प्रसिद्धी हवी असते. त्यानुसार ते वागत असतात. त्या व्हिडिओत अश्लील काय बोललो ते सांगा. जर कुठे त्या व्हिडीओत अश्लील दिसलं असतं तर मी राजकारण सोडलं असतं, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. लढाई लढावी लागते. केलेल्या आरोपांसाठी मी ही लढाई लढेने. मी बेबाक बोलतो. पण हा माणूस जे बोलला ते सत्य बोलतो, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते शिरसाट?

“ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत”, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्या विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला होता.

याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता छत्रपती संभाजी नगरमधील पोलिसांनी या प्रकरणात शिरसाट यांना क्लिन चिट दिली आहे.

- Advertisement -

याशिवाय, “मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. त्याचबरोबर अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. लाखो कोटी रुपयांमध्येही करता येत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात नको. मी भटक्या विमुक्तमधून येते. आमच्याकडे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान करणे हा सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून गुन्हेगाराला 3 रुपयांचा दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जाते”, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

( हेही वाचा: चावी फडणवीसांकडे आहे, मी फक्त सांगतो ते तिजोरी खोलून पैसे देतात; शिंदेंचं मोठं वक्तव्य )

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले शिरसाट?

मंत्रिमंडल विस्तारावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. पण कधी होणार याचं नेमकं उत्तर मी देऊ शकत नाही. अधिवेशनापूर्वी कॅबिनेट विस्तार होईल, असं वाटत मी माझ्या कामात व्यस्त आहे. दे तो भला ना दे तो भी भला असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

विनायक राऊत यांच्या बोलण्याला बेस काय आहे? ते फक्त वावड्या उठवतात. त्यांच्या नाही ठाकरे गटाचे लोक आमच्या संपर्कात आहेत. संजय राऊत आणि कंपनीची कार्यपद्धती पाहा. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं शिरसाट म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -