घरठाणेSSC RESULT 2023 : नवी मुंबईचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.१२ टक्के, मुलींनी मारली बाजी

SSC RESULT 2023 : नवी मुंबईचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.१२ टक्के, मुलींनी मारली बाजी

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीचा निकाल आज २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. नवी मुंबईतील १४१ शाळांमधून १५ हजार ५१८ परिक्षार्थींची नोंद झाली होती. त्यातील १५ हजार ४७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात १४ हजार ७२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नवी मुंबईचा ९५.१२ टक्के लागला आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलांना मागे टाकत मुलींनी बाजी मारली आहे.

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची चमक निकालात पहावयास मिळाली. कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीत निर्बंधामुळे ऑनलाइन आणि मागील वर्षी शालेयस्तरावर १०वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्याने १०० टक्के अभ्यासक्रम आणि विद्यार्थी क्षमतेसह सेंटरनुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या. २५ मे २०२३ रोजी १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर १० वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यातच आज शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा : SSC Result 2023 : दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

विद्यार्थ्यांनी मोबाईल, लॅपटॉपवर पाहिला तर सायबर कॅफेतही गर्दी पहावयास मिळाली. निकालानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एसएमएसद्वारे शुभेच्छा दिल्या. तर राजकीय नेत्यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

- Advertisement -

यंदा १५ दिवस आधी निकाल

विशेष म्हणजे यंदा १५ दिवस आधीच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्याने पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक नियोजन करणे सोपे होणार आहे. येत्या १७ जूननंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमधून निकालाची प्रत उपलब्ध होणार, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी दिली.


हेही वाचा : मुंबईकरांसाठी खुशखबर : कमला नेहरू पार्कमध्ये प्रथमच उभारणार काचेचा पूल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -